
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अनुदानित आश्रम शाळा सावरखेड तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी वर्ग दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत कॉपी करणार नाही अशी सामूहिक शपथ घेण्यात आली.
सदरील अनुदानित आश्रम शाळा सावरखेड येथे दहावी व बारावीचे परीक्षा केंद्र असून फेब्रुवारी मार्च 2026 ची परीक्षा संपूर्णतः कॉपीमुक्त झाले पाहिजे हा उद्देश ठरवून मंडळांनी ठरवून दिलेल्या ननिर्देशानुसार शाळेत कॉपीमुक्त परीक्षा शपथ उपक्रम संपन्न करण्यात आले. याप्रसंगी कुमारी खर्चे मॅडम उच्च माध्यमिक शिक्षिका यांनी शपथ वाचून विद्यार्थ्यांना शपथ दिले तर कुमारी नक्षणे मॅडम यांनी परीक्षेला न घाबरता समोर कसे जायचे याबद्दल मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे श्रीखोले सर यांनी कॉफीचे नुकसान काय होते याबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
