
प्रतिनिधी//शेख रमजान
उमरखेड शहरात रविवारी ताजपुरा वार्डात दोन गटामध्ये आठवडी बाजार येथे समोरासमोर येऊन भांडणात . 27 वर्षीय युवकाचा तलवार, चाकू, लोखंडी रॉडने सपासप हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला.
शेख अजहर शेख अकबर (वय २७, रा. अब्दुल रहमान कॉलनी, उमरखेड) असे मृतकाचे नाव असून, तो मजुरीचे काम करत होता. फिर्यादी शेख खालीद शेख अकबर (वय ३५), मृतकाचा मोठा भाऊ याने दिलेल्या तक्रारीनुसार . रविवारी रात्री शहरातील पीरबाबा दर्गाजवळ कव्वाली कार्यक्रम झाल्यानंतर घरात परतलेल्या फिर्यादीस, शेख मोबीन याचा फोन आला. त्यामध्ये अजहरची तब्येत गंभीर असून त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली. तातडीने रुग्णालयात पोहोचल्यावर अजहरच्या मानेवर, पोटावर व पाठीवर गंभीर जखमा असल्याचे दिसले . डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर शेख तन्वीर उर्फ तंम्या या मित्राकडे काय झाले याची विचारणा केली असता त्याने सांगीतले की, संध्याकाळी ताजपुरा वार्डात दोन गटामध्ये भांडण झाले होते. दोन्ही गटाचे परत रात्री 12:00 ते 12:30 वाजता दरम्यान आठवडी बाजार येथे समोरासमोर येऊन भांडणा मध्ये शेख मुदस्सीर शेख जमील, शेख सोहेल शेख जमील (दोघे रा. ताजपुरा वॉर्ड), शेख उबेद निसार (रा. ताजपुरा वॉर्ड), शेख आरीश शेख खतीब (रा. हुतात्मा चौक) आणि त्यांच्या सोबत असलेल्या ३ ते ४ साथीदारांनी मिळून अजहरवर हल्ला केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. सदर प्रकरणी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आदे
