
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी स्वतःच्याच राहत्या घरी फाशी घेऊन युवा शेतकरी पुत्र सुभाष वसंत अवतारे यांनी आपली जीवन यात्रा संपविली.
या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या घरी दिनांक २२ रोजी राळेगाव उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे, फिरोज भाऊ लाखानी तलाठी मोहन सरतापे यांनी सांत्वनपर भेट दिली.
सततच्या पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान व शेतकर्जाची परतफेड कशी करायची आणि आई वडील, पत्नी, दोन अविवाहित मुली, एक मुलगा यांचं शिक्षण आणि त्यांना जगवायचं कसं या विवणचनेने खचून राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकरी सुभाष वसंत अवतारे यांच्या आई वडील, भाऊ व मुलगा रवी यांची शैलेश काळे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांनी भेट घेऊन सांत्वन केले व मुलामुलींना शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला व शासनाकडून जी काही मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न करू असे यावेळी त्यांनी सांगितले.
