माजरी ग्रामपंचायतीत मनमानी कारभार : ग्रामपंचायत सदस्य स्वप्न कडूदुला यांचा आरोप

माजरी गावातील वॉर्ड क्रमांक 1 ,4 व 5 मध्ये विविध समस्यांनी ग्रासला आहे.वॉर्ड क्रमांक 5 मध्ये माजरीमध्ये, गेल्या दोन वर्षांपासून नाल्यांची योग्य प्रकारे स्वच्छता केली जात नाही, केवळ वॉर्ड क्रमांक ५ मध्येच नाही तर संपूर्ण माजरीमध्ये ती केली जात नाही आणि गेल्या दोन वर्षांपासून, वॉर्ड क्रमांक ५ ४,१ मध्ये विद्युत पोल आहे पण एकच स्ट्रीट लाईट नाही, संपूर्ण वॉर्ड अंधारात आहे, वॉर्ड क्रमांक ५,४,१ मध्ये स्ट्रीट लाईट अत्यंत आवश्यक आहे पण माजरी ग्रामपंचायत दुर्लक्ष केले जात आहे आणि माजरीच्या वॉर्ड क्रमांक ५ मध्ये कचरा वाहन दररोज येत नाही, साफ सफाई होत नाही, माजरी ग्रामपंचायतीच्या कडून प्रत्येक सोलर लाइट अंदजे ३० ते ३२ हजारप्रमाणे अनेक सोलर लाईट खरेदी केले आहे. आणि प्रत्येक वॉर्डात ते पथदिवे बसवले आहेत.त्यातील निम्मे पथदिवे बंद आहेत . 14 वा वित्तीय व 15 वा वित्तीय आणि नागरिक सुविधा निधी अंतर्गत रस्ते व नाली चे काम करण्यात आले आहे. काम अत्यंत खराब दर्जाचे झालेले आहे . यांच्या चौकशी साठी माजरी ग्रामपंचायत सदस्य स्वप्न सतीश कुडूदूला यांना अनेक वेळा चौकशी ची मागणी केली आहे पण प्रशासन याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करत आहे.