दिव्यांगांना फळवाटप व वृक्षारोपण करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा

प्रतिनिधी/ढाणकी:

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा जगमान्य कर्तृत्ववान नेतृत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत, भारतीय जनता पार्टी ढाणकी शहर तर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये दत्त मंदिर टेंभेश्वरनगर येथे सकाळी विविध फळझाडांचे वृक्षारोपण करून, त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार भाजपा ढाणकी तर्फे करण्यात आला. तद्नंतर लगेच कारगिल फाटा स्थित, मूकबधिर विद्यालयातील दिव्यांगांना फळ वाटप करण्यात आले. योगायोग यावेळी उपस्थित भाजपा तालुका उपाध्यक्ष महेश पिंपरवार यांचा सुद्धा वाढदिवस असल्याने, तो सुद्धा उत्साहात करण्यात आला.
याप्रसंगी ढाणकीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल, भाजपा शहराध्यक्ष रोहित वर्मा, तालुका उपाध्यक्ष महेश पिंपरवार, तालुका संघचालक आनंदराव चंद्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश जयस्वाल, गटनेते संतोष पुरी यांसह भाजपा ढाणकीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.