
शिवतीर्थावर लोकांची गर्दी शिवरायांना मानाचा मुजरा विविध कार्यक्रमाचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर
स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज स्वराज्य जननी मॉ साहेब जिजाऊ यांच्या संस्कारांतून घडलेले स्वराज्यांचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाला दिशा देणारे आदर्श राजे होते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा डॉ अशोक उईके यांनी राळेगांव येथील शिवतीर्थ या ठिकाणी आयोजीत दि १९ फेब्रुवारी २०२५ ला छत्रपती महोत्सावाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलतांना केले तसेच शिवतीर्थाच्या विकासाकरीता मी कटिबंद्ध असल्याचे स्पष्ट केले आयोजन समितीने त्यांचा नागरी सत्कार केला .प्रमुख पाहुने उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, तहसीलदार अमित भोईटे , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड प्रफुल चौहान भाजपा ता अध्यक्ष रंजन कोल्हे डॉ कुणाल भोयर महेश कोडापे बबन भोंगारे प्रशांत तायडे नगरसेवक संतोष कोकूलवार संदिप पेंदोर डॉ पांगूळ संजय घिया गणेश देशमुख डॉ कोकरे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा अशोक पिंपरे यांनी केले त्यांनी उत्सव समितीच्या कार्याचा लेखाजोखा मांडला तिन दिवस चाललेल्या छत्रपती महोत्सावाची सुरवात दि १६ फेब्रुवारीला शालेत विद्यार्थ्यां ची शिव सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली .छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक १७ फेब्रुवारी ते १९फेब्रुवारी दरम्यान तीन दिवशीय छत्रपती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले वक्तृत्व स्पर्धा वेशभूषा स्पर्धा महिलांची वेशभूषा स्पर्धा किल्ले स्पर्धा अशा विविध स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या तसेच ॲड निलेश सोनटक्के अमरावती यांनी अष्टपैलू छत्रपती या विषयावर दिनांक १८ फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता उपस्थितांना मार्गदर्शन केले याच दिवशी सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्यात ६ ८ रक्तदात्यांनी रक्तदान केले यात दहा महिलांचा समावेश होता महिलांचा सुद्धा या राष्ट्रीय कार्यात सहभाग दिसून आला दिनांक १९ फेब्रुवारीला सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पुजन नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी , प्रदीप ठुणे , बाळासाहेब धुमाळ नगर सेवक मोहिनी बोबडे कविता कुडमते ,मंगेश राऊत नगरसेवक ,इमरान पठाण ॲड मंगेश बोबडे ॲड अल्पेश देशमुख राजेंद्र नागतूरे भानुदास राऊत विजयराव तायडे सुरेंद्र ताठे अशोक राऊत कृष्णाजी राऊळकर महेश सोनेकर अध्यक्ष यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले . यानंतर शहरातील महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यानंतर दुपारी ३ वाजता आयोजित सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले . दुपारी चार वाजता महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला सायंकाळी शिवतीर्थ या ठिकाणी शहरातील मुख्य रस्त्याने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . या रॅली मधे नामदार अशोक उईके यांच्या सह अधिकारी सामाजीक राजकीय पत्रकारीता क्षेत्रातील लोकांनी सहभाग घेतला . छत्रपती महोत्सवात विविध कार्यक्रमाचे संचलन राजू रोहणकर प्रा रंजय चवधरी शंकर मोहुर्ले सौ नुपूर कोमेरवार सौ वैशाली रोहणकर तब्बसुम शेख सौ मृणाल उत्तरवार यांनी केले . तिन दिवसीय छत्रपती महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रा अशोक पिंपरे मंगेश राऊत नितीन कोमेरवार ॲड मंगेश बोबडे अशोक भागवत अरविंद तामगाडगे सैय्यद लियाकत अली बंडू इंगोलेसं दिलीप कन्नाके संजय दुरबुडे राहूल बहाळे योगेश इंगोले प्रा रंजय चवधरी नितीन कोरडे रुपेष कोठारे प्रविण काकडे महादेव ससाने वैभव इंगोले शुभम चिडाम शेखर आंबाखाये मनोज पेंदोर प्रकाश देवकर विजय मंगळे प्रशिक भोगांडे योगेश ठाकरे अक्षय विरुळकर लोकेश गायकवाड चेतन बेंबारे फैजन शेख मंगेश पिंपरे बादशा काझी अकरम खान हिमांशु किनाके यांच्या सह जिजाऊ बिग्रेड च्या महिलांनी परीश्रम घेतले .
