
प्रतिनिधी: प्रवीण जोशी
ढाणकी
ढाणकी पासून जवळच असलेल्या मौजा गांजेगावची लोकसंख्या जेमतेम तीन हजार असून येथील युवक छत्रपतींच्या विचाराचा वारसा चालवताना दिसत आहे अनेक मंडळी शिवजयंतीच्या दिवशी विविध कार्यक्रमात डीजे आणि दुचाकी रॅली काढून अभिवादन करत असताना आपण बघितलेच असेल पण गांजेगावातील समस्त गावकरी बांधवांनी विशेष करून तरुणांनी पुढाकार घेऊन एका छोट्याशा लहान बाळाला कर्करोगाला सामोरे जावे लागले व त्यास काहीतरी मदत करायची या आशेने व गावकऱ्यांना मदतीची आव्हान केले व तशा प्रकारच्या आव्हान करताच गावकऱ्यांनी सुद्धा त्यांना उत्तम प्रतिसाद तर दिलाच प्रतिसाद सत्यात उतरवला तो पर्यंत येथील तरुणाई थांबली नाही हे विशेष
खरोखरच शिवजयंतीच्या दिवशी मदतीची आव्हान केल्यानंतर काही क्षणात तीस हजार रुपये वर्गणी गोळा होते यावरून शिवाजी महाराज यांच्या वैचारिक पगडा समाज मनावर किती खोलवर बिंबवल्या गेला असेल हे यावरून समजते. विहर्ष आशिष खीरे या तीन वर्षे चिमुरड्याला कर्करोगाणे ग्रासले हे दुर्दैवच म्हणावे लागेल एक दिवस विहर्ष हा नियमित प्रमाणे खेळत असताना गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे खेळणे बागडणे थोडे मंदावले त्यामुळे त्यांच्या परिवाराला एक वेगळा संशय आला की रोज खेळणारा विहर्ष असा कशामुळे वागतोय आणि उपचारासाठी डॉक्टरकडे नेले असता त्याला कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले विविध खेळ खेळण्याच्या वयामध्ये अशा प्रकारचा आजार बळवल्यामुळे त्याच्या आई वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली वास्तवता हे वय खेळण्याचे बागडण्याचे आणि खेळाच्या व सभोवतालच्या परिसराचे अवलोकन करण्याचे पाटीवर विविध विषयाचा अभ्यासक्रम गिरवायचा सोडून अशा प्रकारे कर्करोग झाल्यामुळे नक्कीच आई-वडिलांची अवस्था पाण्यातून काढलेल्या माशाप्रमाणे झालेली असावी जशी की “घार उडाली आकाशी पण तिचे चित्त पिल्लापाशी” अशीच अवस्था आशिषरावांची व त्यांच्या कुटुंबाची झाली असणार तसेच कर्करोगावर उपचार करणे ही जरा खर्चिक बाजू असून गांजेगाव परिसरातील शेती हाच एकमेव व्यवसाय आहे आणि या व्यवसायावरच घर गाडा चालतो सध्या वीहर्ष हैदराबाद येथे उपचार घेतो आहे पण गावकऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे नक्कीच थोडा हातभार लागेल व त्याच्या प्रकृतीत सुधारणा होईल अशी आशा गावकरी बाळगून आहेत. आपण नेहमीच म्हणत असतो की जगात कोणीच कोणाचे नसते पण या कृतीमुळे व कर्मामुळे गांजेगावातील गावकऱ्यांनी ही मन मात्र साफ खोटी ठरवली आज रोजी एखादा सर्वसाधारण आजार झाला म्हणजे माणूस प्रचंड घाबरून जातो त्यावेळी केवळ पैसेच काम करत नाही तर रुग्णाचे व त्याच्या नातेवाईकाचे मानसिक खच्चीकरण न करता त्यास बळ देणे जरुरी असते पण गांजेगाव येथील गावकऱ्यांनी आर्थिक व मानसिक केलेल्या मदतीमुळे नक्कीच या परिवाराचे मनोबल उंचावेल व सकारात्मक विचार जन्माला येऊन.विहर्ष पुन्हा अंगणामध्ये खेळेल आणि बागडेल व आशिषरावांच्या व त्यांच्या परिवाराच्या डोळ्यांमध्ये पुन्हा आनंदाचे क्षण बघायला मिळतील एवढे नक्की