
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
राळेगाव (ग्रामीण): राळेगाव तालुक्यातील दहेगाव च्या मैदानात राळेगाव पंचायत समिती अंतर्गत खेळ क्रीडा व कला संवर्धन केंद्र खैरी अंतर्गत च्या वतीने आयोजित दोन दिवसीय केंद्रस्तरीय सामने क्रीडा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे नुकतेच सहा ते बारा वयोगटातील चीमुले विद्यार्थ्यांचे दमदार विद्यार्थ्यांचे दमदार उत्साह व रोमहर्षक लढतीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
या खेळ व क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन सौ नंदाताई ताजणे उपसरपंच दहेगाव यांच्या हस्ते होऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष जुमनाके अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती दहिगाव यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख पाहुणे म्हणून खैरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री हरिदास वैरागडे खैरी कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप आडे तसेच सुरेश कुंभलकर मुख्याध्यापक खैरी, व इतर सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व केंद्रातील शिक्षक हे दहेगाव हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी राजश्री यादव मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव यांनी तर प्रास्ताविक नितीन पाटील सर यांनी केले या खेळ व क्रीडा स्पर्धेत विजयी जम्मू म्हणून वर्ग६ते ११ मध्ये कबड्डी लंगडी मध्ये मुलींनी दहेगाव शाळेच्या मुलींनी बाजी मारली. वयोगट ११ ते १४ यामध्ये कबड्डी या खेळात शाळेच्या मुलींनी बाजी मारली तसेच लंगडी या खेळात खरेदी केंद्रशाळेच्या मुलींनी बाजी मारली. वैयक्तिक या खेळामध्ये पिंपरी सावित्री, आष्टोना, व खई केंद्र शाळेच्या मुलींनी बाजी मारली ह्या वैयक्तिक स्पर्धा होत्या.
या कार्यक्रमाला श्री. शेषरावजी ताजने, श्री. हरिदासनी वैरागडे (केन्द्रप्रमुख) तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे इतर सदस्य उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक :- कु. राजश्री यादव (मुख्याध्यापक ) जी.प.उ.प्रा. शाळा, दहेगाव यांनी केले तर संचलन नितिन पाटील सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन कु. सुनिता धूळे मॅडम. यांनी केले या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन खैरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री हरिदास वैरागडे यांनी केले असून या कार्यक्रमासाठीश्री.यु.डी शेंडे, श्री. अगोल सरोदे, खांडेकर सर, बाराहाते सर, कुडमचे सर व इतर सर्व शिक्षक यांनी पथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मदत केली. यात महत्त्वाची भूमिका केंद्रप्रमुख हरिदास वैरागडे सर यांनी पार पाडली.
