फाटक्या जनसेवकाची ऑडिओ रेकॉर्डिंग वायरल

वरोरा तालुक्यात मुख्यतः सोयाबीन ,कापूस ,तूर या पिकाचे उत्पादन घेणारा मोठा शेतकरी वर्ग आहे.परंतु राज्य सरकारने कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति टन अनुदान जाहीर केले .सरकारने जाहीर केलेले अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कागद पत्रासह मागणी करण्यासाठी महाराष्ट्र भरातील बाजार समित्यांना पत्र मिळाले.त्यानुसार वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या 7/12 वर बोगस कांदा उत्पादन दाखवत 65 हजार क्विंटल कांदा उत्पादन असल्याचा बनाव रचत दोन कोटी तीस लाख रुपयांचे अनुदान लाटण्याचा प्रकार वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये घडला.

काही शेतकऱ्यांकडून कांदा अनुदानाचे कमिशन वसूल सुद्धा करण्यात आले होते, मात्र ही बाब जेंव्हा उघड झाली तेंव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेला हा बनाव समोर आला, या प्रकरणात कुणाला किती पैसे मिळाले यांची उत्सुकता सर्वाना होती व मला सुद्धा यातील हिस्सा मिळाला पाहिजे म्हणून जो तो या घोटाळ्याचे प्रमुख दोन सूत्रधार यासह काही कर्मचारी व व्यापारी यांच्याकडून दानदक्षिणा मिळते का यासाठी प्रयत्न करीत आहे.
वरोरा तालुक्यातील असाच एक चिंदी चोर ,स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणणारा एक महाभाग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माझ्याकडे चाळीस शेतकऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग आहे तुम्हाला यातून वाचायचे असेल तर मला पाच शेतकऱ्यांचे कांदा अनुदानाचे पैसे परत करा अन्यथा मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जहर पिणार अशी धमकी दिली आहे. तो फोन कॉल समाज माध्यमांवर वायरल झाल्याने त्या फाटक्या ,चिंदी चोर ,लाचत नेत्यांची चांगली इज्जत वाढल्याचे ऐकण्यास मिळत आहे.