
उमरखेड व महागाव मतदारसंघाचे आमदार श्री नामदेव ससाने व नितीनजी भुतडा, महंत योगीराज बापू उखळाई, यांच्या हस्ते काल नाईक रुग्णालयाचे उद्घाटन सोहळा पार पडले, जनकल्याणासाठी व आरोग्य कल्याणासाठी धावून जाणारे लोकनेते आदरणीय ससाने साहेब हे लग्न असो किंवा उद्घाटन असो तालुक्यामधील सर्व गावांमध्ये त्यांची उपस्थिती राहते असे लोकप्रिय नेते नाईक रुग्णालयाला उद्घाटन प्रसंगी लाभले त्यांचे सत्कार श्री बळवंतराव नाईक जिल्हा अध्यक्ष शहरा आ भारतीय जनता पार्टी यवतमाळ यांच्या हस्ते झाले. डॉक्टर श्री कृष्ण बळवंतराव नाईक यांच्या बाल रुग्णालय यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत, उपस्थित मान्यवर सुदर्शन पाटील तालुकाध्यक्ष भाजपा, पुंडलिक कुबडे सरचिटणीस भाजपा, सर्व कार्यकर्ते व सहनागरीक, लोकगीत महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी संदीप बळीराम जाधव हे सर्व उपस्थित होते.
