
चंद्रपूर शहरात वारंवार आग लागत असल्याने प्रशासन फायर ऑडिट करत आहे की नाही या वर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.चंद्रपूर शहरात दुकानांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असून दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी जटपुरा गेट परिसरातील वसंत भवन जवळ असलेल्या एम फोर यु (M4U) ह्या कापड दुकानाला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. चंद्रपूर महापालिका आपल्या हद्दीतील दुकानांमध्ये अग्निरोधक यंत्रणा स्थापित आहे अथवा नाही ह्याची तपासणी (Fire Audit) करत आहे का? असा प्रश्न निर्माण होत असुन आस्थपणांना परवानगी देण्यापूर्वी सुरक्षा नियमांची अंमलबजावणी होते किंवा नाही ह्याची पडताळणी न करताच मनपा नाहरकत प्रमाणपत्र देत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, जटपुरा गेट लगत असलेल्या जिल्हा परिषदेच्या वसंत भवन ह्या इमारतीत असलेल्या M 4 U या कापड दुकानात रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान आग लागल्याचे लक्षात आले. या आगीत सदर कापड दुकान संपूर्णपने भस्मसात झाले असुन दिवाळीनिमित्त विक्रीस आणलेले कपडेही आगीत भस्मसात झाले. चंद्रपूर शहरात एक कापड मॉल सुरू झाला असुन त्या मॉल मध्ये चिक्कार गर्दी उसळली होती मात्र ह्यामुळे शहरातील कित्येक कापड दुकानदारांच्या व्यवसायाला ग्रहण लागले व त्यांनी दिवाळीनिमित्त मागवलेला बराचसा माल दुकानांत पडुन होता.
आगीत भस्मसात झालेले M4U हे दुकानं चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांवर असून प्राप्त माहितीनुसार दुकान मालक 10 वाजताच दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री 11 वाजातच्या सुमारास दुकानातून धुर निघत असल्याचे लक्षात यायला लागले. दुकानाचे शटर बंद असल्यामुळे आग आत मध्ये लागली तरी बराच वेळ लोकांना कळले नाही. आग लागल्याने काही वेळानी दुकानाचे काच फुटल्याने धूर बाहेर येऊ लागला त्यामुळेच लोकांना आग लागली असल्याचे लक्षात आले.
