
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड –
किनवट तालुक्यातील शिवनी येथील इसार पेट्रोल पंपाजवळ आज दि 2 ऑक्टोबर रोजी हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील एकाच कुटुंबातील 25 ते 30 नागरिक तेलंगणा राज्यातील आडेला माता देवीचा नवस फेडण्यासाठी जात असताना शिवनी परिसरात अचानक त्यांच्या गाडीसमोर एक शेळी आल्याने त्यांचा भीषण अपघात झाला त्यात पिकप टेम्पो नो.MH 26 H 3548 हा पलटी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील बारा ते तेरा जण गंभीर जखमी झाले आहेत तर 19 जणास नांदेड येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले व इतर नागरिकांवर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहे…
याबाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव तालुक्यातील हस्करा बोरगाव येथील एकाच कुटुंबातील नागरिक दिनांक 2 ऑक्टोबर रोजी तेलंगणा राज्यातील आडेला माता देवीचा नवस फेडण्यासाठी गावातील काही लोकांना सोबत घेऊन शिवनी मार्गे जात असताना त्यांच्या पिकप टेम्पो नो.MH 26 H 3548 समोर अचानक एक शेळी आल्याने त्यांचा भीषण अपघात झाला त्यात 28 जण जखमी झाले आहेत तर 19 जण नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे हिमायतनगर येथील डॉक्टरांनी सांगितले त्यात कोंडाबाई रामराव जाधव, भाग्यश्री प्रभाकर जाधव, अंकिता साहेबराव जाधव, लोभाजी रामराव जाधव, आशा लोभाजी जाधव, साहेबराव रामराव जाधव, चतुराबाई किशन उपरे, मंजुषा प्रभाकर सोळंके, संदीप सुभाषराव जाधव, धनंजय विठ्ठलराव जाधव, खंडेराव बालाजी सोळंके, भागवत भगवान सोळंके, प्रभाकर दत्ताराव सोळंके ,शंकर नारायण सरोदे ,कौशल्य शंकर सरोदे, प्रभाकर रामराव जाधव, गोदावरी देवानंद सोळंके, सुमन सुभाष जाधव, रितेश प्रमोद वानखेडे, कौशल्या प्रमोद वानखेडे, सुभाष रामराव जाधव ,अंजली लोभाजी जाधव, रेखा सुभाष जाधव, गोदावरी शिवराम जाधव, परमेश्वर सुभाष जाधव, गायत्री संदीप जाधव , गणेश वानखेडे सह प्रमोद वानखेडे असे 28 जण गंभीर जखमी झाले आहेत यांच्यावर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या टीम ने शहरातील काही खाजगी डॉक्टरांच्या मदतीने उपचार करून ह्यातील 19 गंभीर जखमींना हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मदतीने तात्काळ पाच ॲम्बुलन्सची व्यवस्था करून त्यांना नांदेड येथील रुग्णालयात पाठविले असल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले,
