राळेगाव तालुक्यातील पिंपरी दुर्ग येथील शेतकरी आशिष इंगोले यांच्या शेतातील झाले नुकसान,उभे पीक खरडून निघाले

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील पिपंरी दुर्ग येथील शेतकरी आशिष इंगोले यांच्या शेतातील झालेले नुकसान 31 आगस्ट च्या रात्री झालेल्या पावसामुळे रामगंगा नदीला खुप मोठया प्रमाणात पूर आला व नदीचे पाणी शेतात जाऊन अंदाजे 2 एकर मधील उभे पीक जमीन दोस्त झाले आहे
पहिलेच 1 महिना पाऊस होता त्यानंतर शेताची मशागत करून कपाशी चांगली केली परंतु अजुन पुर येऊन खुप नुकसान झाले
विशेष बाब म्हणजे 21 जुलै 2022 रोजी आलेल्या मोठया पुरामध्ये सुद्धा शेतातील खुप मोठा बांध फोडून पाणी शेतातून गेले खुप मोठया प्रमाणात नुकसान झाले त्या नंतर जलसंधारण विभागातून नाला खोली करण व बंधारा चे काम मंजुर झाले होते बहुतेक टेंडर पण झाले होते परंतु आज पर्यंत काम सुरु झाले नाही नाला खोली करण चे काम झाले असते तर आज माझे एवढे नुकसान झाले नसते