
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव विधानसभा मतदारसंघातील कळंब शहर व तालुक्यातील शेकडो मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर व आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके व जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेश कार्यक्रमात कळंब परिसरातील विविध राजकीय, सामाजिक पातळीवर सक्रिय असलेल्या मान्यवरांनी भगव्या पक्षाचा स्वीकार करत नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
या प्रवेश सोहळ्याद्वारे राळेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा संघटनात्मक बळकटीकडे निर्णायक पावले टाकत आहे, असे स्पष्ट दिसून आले. डॉ. अशोक उईके यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे व त्यांच्याशी असलेल्या थेट संवादातून प्रेरणा घेत कळंबमधील कार्यकर्त्यांनी भाजपात सामील होण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया नवप्रवेशितांतून व्यक्त झाली.
प्रवेश घेणाऱ्यांमध्ये नगरसेवक आशिष धाबे, नगरसेवक रुपेश राऊत, नगरसेवक सागर समुद्रे, निखिल माणिकराव ठाकरे, मिथुन कुठे, देवानंद वरफडे, देवेंद्र वानखडे, देवराव राठोड, आदर्श चिंचारकर, शांतीलाल चव्हाण, लक्ष्मण सुरपाम, अशोक गायकवाड, चंदन खोडे, देविदास रामगडे, अनिकेत भोयर, गजानन खडसे, हरीश कोळसे, अक्षय लोणासावळे, श्रावण चव्हाण, देविदास डवले, उमेश शेंद्रे, नाथोजी वाघाडे, नितीन ठाकरे, ठाकूरसिंग राठोड, प्रवीण माधव राठोड, सुरेश राठोड, लखू कुमरे, मधुकर आत्राम, अनिल टेकाम, उत्तम सुरपाम, अंबादास सहारे, श्यामलाल जयस्वाल, रमेश अलंबनकार, छगन कासार, राजेंद्र देशेवर, फैजान शेख, विजय वैद्य, भोनुदास धोडाम, राजू दूसे, वैभव हिवरकर, उमेश वाघ, अभिजीत कात्रे, रुपेश अंबटकर, आकाश भोयर, शुभम चाफले, प्रताप साखरकर, नितीन पटाईत, सागर भोयर, पंकज धपके, नानाजी वाघाडे, संदीप कोल्हे, विनोद पाटील, पुरुषोत्तम मेहर यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी प्रवेश घेतला.
या प्रवेशामुळे कळंब शहरासह परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल घडून येण्याची शक्यता असून, हे सर्वच कार्यकर्ते भाजपाच्या विचारधारेचा प्रसार करत कार्यक्षेत्रात सक्रीय होतील, असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला. डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली राळेगाव मतदारसंघात झालेल्या विकासकामांची फलश्रुती म्हणून हे प्रवेश पाहिले जात असून, मतदारसंघाच्या प्रत्येक भागात भाजपाचे बळ वाढत असल्याचे स्पष्ट संकेत यामुळे मिळत आहेत.
या वेळी कैलाश बोंद्रे,मनोज काळे (तालुकाध्यक्ष, कळंब), दिनेश वानखेडे, अनुप भालेराव, संदीप वैद्य यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण वातावरणात उत्साहाचे आणि नव्या ऊर्जा निर्माण होण्याचे संकेत या सोहळ्याने दिले आहेत.
हा प्रवेश कार्यक्रम म्हणजे डॉ. अशोक उईके यांच्यावर असलेल्या जनतेच्या विश्वासाचे प्रत्यंतर असून, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि जनसंपर्कामुळे कळंबमधील असंख्य कार्यकर्ते भाजपा परिवाराचा भाग झाले आहेत, ही बाब भविष्यातील राजकीय घडामोडींना निश्चितच प्रभावीत करणार आहे.
