
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याबाबत दिनांक ११/०९/२०२५ पर्यंत चतुर्थ श्रेणी मंजुर न झाल्यास १२/०९/२०२५ पासुन मा. महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या क्षेत्रामध्ये बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे.महसूल मंत्री महाराष्ट्र शासन (मार्फत मा. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूर) यांना दिनांक 3/9/2025 रोजी निवेदन दिले
महाराष्ट्र राज्यातील महसुल महसुल सेवक, (कोतवाल) कणा आहे. विभागातील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा महाराष्ट्र राज्याची विविध शासकीय धोरणे उपाययोजना, शासन स्तरापासुन ते गाव पातळीवरील महत्त्वाच्या योजना तसेच केंद्र शासनाच्या राज्यात सुरु असणाऱ्या महत्वाच्या योजना इत्यादींची अमलबजावणी राज्यातील अंतिम घटकापर्यंत व्यवस्थित रित्या पोहचवण्यासाठी. राज्यातील महसूल यंत्रणा. मा. जल्हाधिकारी ते महसूल सेवक (कोतवाल) स्तरापर्यंत कार्यरत असते. महसूल विभाग हा राज्य शासनाचा क्षेत्रीय योजना राबविणारा. सर्वात प्रमुख विभाग आहे. महसुली कामाबरोबरच विविध प्रमाणपत्र देणे. कृषी गटांना शासनाच्या विविध योजना अभियान मोहिमांचे मा समन्वय, आपत्ती टंचाई, जनगणना, निवडणुका राजशिष्टाचार, विविध जात प्रमाणपत्रे देणे अशा अनेक बिगर समाई सुली कामाची जबाबदारी महसूल विभागावर असते. त्याअर्थी सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजांची निगडित असलेला, आणि त्यामुळे शासनाची प्रतिमा प्रतिबिंबित करणारा हा विभाग आहे.
क्षेत्रीय स्तरावर तलाठी साझा तसेच वरिष्ठ महसुली कार्यालयात महसूल सेवक (कोतवाल) २४ साग ना शासकीय सेवा देत असून महसूल सेवक (कोतवाल) आपली जबाबदारी योग्यरिता पार पाडत असतो. परंतु दि 815 शासनाने अद्यापर्यंत महसूल सेवक (कोतवाल) पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्या प्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाही. त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना महसूल सेवक (कोतवाल) यांना खूप अन्याय सहन करावा लागत आहे महसूल सेवक (कोतवाल) पदाचे महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेता महसूल सेवक (कोतवाल) याना इतर महसूल कर्मचाऱ्या प्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन महसूल सेवक कर्मचारी यांचा वरील अन्याय दूर करावा अन्यथा सर्व महसुल सेवक टप्या टप्याने खालीलप्रमाणे आंदोलन करण्याचे योजीले आहे. तरी महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा लककरात लवकर लागु करावा अशी मागणी निवेदनात देण्यात आली या वेळी अध्यक्ष रुपेश पेचे,उपाध्यक्ष उमेश टेकाम,सचिव रुपेश चांदेकर अरुण मडावी, अमोल बोरकर,विठ्ठल किनवटकर,दिनेश पेंदोर व असंख्य सदस्य उपस्तित होते