सहसंपादक : रामभाऊ भोयर
बाल श्री गुरुदेव समितीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथीच्या पावन पर्वावर महाशिव पुराण कथेचे 24/11/24 पासून महाशिव पुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते दररोज गावातून सकाळी सातहि दिवस पहाटे 5:30 ते 6 वाजेपर्यंत सामुदायिक ध्यान व 6 ते 8 गावातून रामधुन ग्राम स्वच्छता अभियान तसेच सायंकाळी 8 ते दहा महाशिव पुराण कथा असा सतही दिवस चालणाऱ्या या उपक्रम आयोजित करण्यात आला असून दिनांक 24/11/24 रोजी उद्घाटन सोहळा पार पडला त्या दरम्यान ह.भ. प. आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या कडून मार्गदर्शन करण्यात आले त्या वेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार अंगात रुजविण्याची गरज असून गावात जातीपात, राजकारण,कलह निर्माण न करता सामाजिक कार्यक्रम भागवत असो की महाशिवपुरण असो त्यातून कलह निर्माण न करता एकीने सामाजिक कार्यक्रम पार पडणे गरजेचे असल्याचं बोलत होते त्यामुळे येणाऱ्या पुढील पिढीला सनातन धर्माची वाटचाल करता येणार आहे,सनातन धर्म टिकवायचा असेल तर गावात धार्मिक कार्यक्रम होऊन अंगात राष्ट्रसंताचे विचार अंगात रुजने महत्वाचे असल्याचं उद्घाटना प्रसंगी बोलत होते महाशिव पुराण कथे दरम्यान विविध प्रकारच्या झाक्या काढण्यात आल्या असता भगवान शिवभोलेनाथ व माता पार्वती यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला त्या वेळी नंदी महाराज देव दानव दैत्य अश्या विविध प्रकारच्या महाशिव पुराण कथे दरम्यान वेशभूषा बालकांकडून धारण करण्यात आल्या त्या वेळी गावातील भाविकांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती दर्शवून भक्तिमय वातावरणाचा लाभ घेतला असून गावात आनंददायी व भक्तिमय वातावरणात निर्माण झाले आहे सातत्याने दरवर्षी याच प्रकारे गावात श्रीमद संगीतमय महाशिव पुराण कथा अथवा भागवत असे सातत्याने दरवर्षी मंडळाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचं मंडळाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
गेल्या 2001 पासून ते 2016 पर्यंत बाल श्री गुरुदेव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते मात्र गावातील काही राजकारण्यांनी
राजकीय हेतू करीता दोन गट निर्माण करून गावात दुफळी निर्माण केली गावात दोन भागवत दोन नवरात्री उत्सव दोन पोळे तयार करून गावात कलह निर्माण केला असल्याचे ग्रामस्थांन कडून बोलले जात असून चांगलाच चांगलाच चर्चेचा विषय बनत असल्याने या यावर्षी पुन्हा श्री गुरुदेव मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे सूत्र पुन्हा हाती घेतले असून गावातील ग्रामस्थांन कडून मंडळाचे अभिनंदन करण्यात येत आहे 1/12/24/ रोजी गावातून भजन दिंडी व पालखी सह शोभा यात्रा काढून ह.भ. प. कथा प्रवक्त्या सू श्री . अंकिताताई खाडंगे यांच्या वतीने काल्याचे कीर्तन करण्यात आले
त्या वेळी काला म्हणजे कार्यक्रमाची नुसती सांगताच नसून ज्या प्रमाणे दही आणि लाही साखर लोणचे यांचं मिश्रण केल्यावर त्यात जो गोडवा निर्माण होतो त्याच प्रमाणे मानवाने सुधा कुठल्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात कलह निर्माण करता गावात दुफळी निर्माण न करता आपल्या मानव रुपी जीवनातला अहंकार नश्ट करून सगळ्यांन सोबत गोडवा निर्माण करून मानव देहाचे कल्याण करावे कुठल्याही कामात चित मन एकाग्र करावे देवावर विश्वास ठेवावा हरीने हरीले भान माझे आता जावू कैसी जाऊ घरा तो लौकिक नाही बरा देवावर भार सोपवा देव करतील सगळे बरा देवावर विश्वास ठेवा परम पिता परमेश्वर सगळे दुःख दूर करतील त्याच प्रमाणे हा काला.
कु सू श्री आंकिताताई खांडगे तसेच मंडळाच्या वतीने दरवर्षी
नित्यनेमाने याच प्रमाणे दरवर्षी कार्यक्रम आयोजित करून गावात भक्तिमय व आनंदमयी वातावरण निर्माण करावे अशी मागणी ग्रामस्थान कडून करण्यात येत काला व महाप्रसाद करून महाशिव पुराण कथेचे समारोपीय कार्यक्रमात पार पडले