
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
कमी श्रमामध्ये पैसे कसे मिळतील याकडे नवयुवकांचे लक्ष सध्या दिसत आहे वेगवेगळ्या नशेची व मौजमजा करण्याची जणू काही स्पर्धाच बघायला मिळत असल्या कारणाने हे सर्व करण्यासाठी पैसे नेमके आणायची तरी कुठून मग काही तरुण मंडळी भन्नाट युक्तीचा वापर करून दुचाकी चोरण्याचा जणूसपाटाच लावतात पण अशा चोरीच्या व अर्धवट दस्तावेज कागदपत्र असलेल्या दुचाकी खरेदीदारांनी सुद्धा खरेदी करताना सावधगिरी बाळगूनच व सजग राहून वाहन खरेदी करणे जरुरी आहे. काही दिवसापूर्वी बिटरगाव(बू )पोलीसस्थानक आणि उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर ढाणकी अशा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत असलेल्या शहरात व गावखेड्यात दुचाकी चोरणाऱ्यांची मजल गेली आहे त्यामुळे चोरांचे मनसुबे किती खोलवर रुजले आहे याचा अंदाज येतो. पण अशा चोरीच्या दुचाकी किंवा कोणतीही वाहन विकत घेणाऱ्याने सुद्धा विकत न घेतल्यास असा गैरप्रकार करणाऱ्यांना नक्कीच आळा बसेल व कोणत्याही प्रकारच्या दस्तऐवजाची चौकशी न करता स्वस्तामध्ये वाहन मिळत आहे म्हणून खरेदी केल्यास चोरीचे वाहन आपण विकू शकतो अशा प्रकारचा दुचाकी चोरांचा एक प्रकारे आत्मविश्वास उंचावून त्यांचे चोरी करण्याचे प्रमाण अधिक होईल म्हणून स्वस्त मिळत आहे पण कागदपत्रे दस्ताएवेज अचूक नसल्यास वाहन खरेदी करणे टाळले पाहिजे.
तसेच दुचाकी कुठलातरी बहाना व थापा मारून विकल्या जाते आणि घेणारे देखील कमी पैशात दुचाकी मिळते म्हणून खरेदी करतात पुन्हा मात्र वाहन विकणारा उर्वरित रकमेसाठी येत नाही किंवा कागदपत्र आणून देत नाही तसेच जोपर्यंत आरोपीला पकडले जात नाही तोपर्यंत कमी पैशात दुचाकी मिळाली म्हणून खरेदीदार देखील बिनधास्त असतो परंतु दुचाकी चोराला पकडले आणि चोरलेल्या दुचाकीच्या चौकशीत खरेदीदाराचे नावे समोर आले म्हणजे तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी दयनीय अवस्था स्वस्त मिळत आहे म्हणून वाहन खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे होते. चारचाकी किंवा तत्सम कोणतेही वाहन खरेदी करत असताना प्रथम त्याचे दस्तऐवज खरेदीदारांनी तपासून बघितले पाहिजे तसेच कागदपत्रे बनावट आहे की खरी आहे याची चाचपणी करून घ्यायला पाहिजे त्यानंतरच वाहनाच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करावा अन्यथा खरेदीदाराला भविष्यात अनेक समस्याला सामोरे जावे लागेल व त्यावेळी कायदा त्यांच्या विरोधात असतो याची जाणीव ठेवून आपला व्यवहार पारदर्शक आणि चोख ठेवावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुजाता बन्सोड यांनी केले आहे.
