मुख्यमंत्री लाडकी पांदन रस्ता योजना कधी ?

सहसंपादक: रामभाऊ भोयर

सध्य स्थितीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आदी योजना शासनातर्फे राबवल्या जात आहेत पण शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पांदन रस्त्यांचा वनवास मात्र अजून संपलेला नसून मुख्यमंत्री लाडकी पानंद रस्ता योजना कधी येणार याची वाट पानंद रस्ताग्रस्त शेतकरी पाहत आहेतllll राळेगाव तालुक्याचा तसेच शहराचा विचार केल्यास तालुक्यात मोठ्या प्रमाणात पानंद रस्ते आहेत या पानंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते पावसाच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना शेतात जाणे खत नेणे मजूर नेणे बैलबंडीने जाणे आधी गोष्टी त्रासदायक होतात आणि शेतमाल निघाल्यावर तो मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी खूप कसरत करावी लागते अशीच व्यथा शहराला लागून असलेल राळेगाव गुजरी पानंद रस्त्याची आहे या रस्त्याचा वनवास अनेक वर्ष होऊन संपलेला नाही या पानंद रस्त्याचे दोन वेळा माती काम झाले पण खडीकरण मात्र झाले नाही गावातून येणारे पाणी किंवा इतरही बांधाच्या पाण्यामुळे रस्त्याची हालत दिवसेंदिवस खराब होत आहेत या रस्त्याला लागून जवळपास शंभरक शेतकऱ्यांचे शेत आहेत अनेक वेळा पानंद रस्त्या संबंधात शासन प्रशासनाला निवेदन दिले पण काहीही फायदा झाला नाही पानंद रस्त्यासाठी मुख्यमंत्री पानंद रस्ता योजना पालकमंत्री पानंद रस्ता योजना मातोश्री पानंद रस्ता योजना आदी योजना राबवल्या जातात यातील बहुतांश पानंद रस्ता योजना या ग्रामीण भागातील पानंद रस्त्यासाठी आहेत नगरपंचायत क्षेत्रातील पानंद रस्त्यासाठी मात्र योजनांचा दुष्काळ आहेत राळेगाव गुजरी पानंद रस्त्याचे एक टोक शहराला लागून असल्याने काही योजनांमध्ये हा रस्ता बसत नसल्याचे कारण दिले जाते. एकदा एमआरजीएस मधून या रस्त्याच्या माती काम झाले होते तेव्हा राळेगाव मध्ये ग्रामपंचायत होते पण माती काम झाल्यानंतर लगेच नगरपंचायत अस्तित्वात आली व या रस्त्याचे काम तसेच राहिले एमआरजीएस मधून नाही तर एस आर जी एस मधून गौण खनिज योजनेमधून किंवा कुठल्यातरी पानंद रस्ते योजने मधून किंवा लोकप्रतिनिधींनी आपल्या निधीतून या रस्त्यांचे खडीकरण करणे आवश्यक आहे काही वेळा दोन-चार शेतकऱ्यांनी पैसे जमा करून एक-दोन ठिकाणी मुरूम टाकला पण एका हंगामातच रस्ता जैसे थे होतो राज्याचे मुख्यमंत्री समाजातील अनेक घटकांचा विचार करून नवनवीन योजना आणत आहेत अशाच प्रकारची एखादी योजना पानंद रस्त्यासाठी सुद्धा आणली तर निश्चितच शहरातील तसेच तालुक्यातील पानंद रस्त्यांचा वनवास संपून पानंद रस्ते मोकळा श्वास घेतील व शेतकऱ्यांचे जीवन सुखकर होतील यामुळेच मुख्यमंत्री लाडकी पानंद रस्ते योजना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे