शैक्षणीक पात्रता नसलेल्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली,
ढाणकी येथील कोचिंग क्लासेस मधील प्रकार

संग्रहित फोटो

त्या त्रिकूटातील एका जवळ बारावीची गुणपत्रिका आहे??

ढाणकी प्रतिनिधी
प्रवीण जोशी


आपल्या देशातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत नसल्याचे दिसून येत आहे शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने खासगी कोचिंग क्लासेस घेणाऱ्या संस्थांची शैक्षणिक फिस गगणाला भिडलेली असताना त्या कोचिंग क्लासेसमध्ये खरचं शैक्षणीक पात्रता असलेली शिक्षक आहेत का ? हा सवाल पालकांना का पडत नाही हा मुद्दा जाणकार नागरीकांना पचनी पडलेला नाही.
अनेक ठिकाणी बोगस शिक्षक खाजगी कोचिंग क्लासेस च्या नावाखाली पालकांची लूट केल्याचे प्रकरण अनेक ठिकाणी उघड झालेले असताना आता ढाणकी येथे ही बोगस शिक्षकांचा सुळसुळाट झाल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य उद्धस्त होण्याची भीती जाणकार नागरीक वर्तवतांना आढळून येत आहे. कोचिंग क्लासेसमध्ये बोगस शिक्षक जर विद्यार्थ्यांच्या शिकवणी घेत असतील तर उद्याच्या देशाच नेतृत्व करणारे आजचे विद्यार्थी उद्धवस्त झाल्यावाचून राहणार नाहीत. या बोगस शिक्षकांवर कोणीही कारवाई करायला तयार नाही. असे असताना आपण देशातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली जाईल याचा केवळ गवगवाच केला जातो. तरी प्रत्यक्षात खाजगी शैक्षणीक क्षेत्रात धनदांडग्यांचा पैसाच चालतो अशी म्हणण्याची वेळ आली असेही जाणकार नागरीकांमधून बोलले जाते.


लहान मुलांना जसे शिकवले तसे ते अनुकरण करत असतात पण ज्ञान देणाऱ्या एका बाहेर शहरातून आलेल्या कोचिंग क्लासेस वाल्याजवळ बारावी पास झाल्याची गुणपत्रिका नसताना ते आपल्या नातेवाईकांच्या आधाराने सगळे काही चालवत असल्याचे मोठ्या प्रमाणात चर्चिल्या जात आहे तेव्हा पालकांनी जागृक व सजग राहून आपल्या पाल्यांना शैक्षणिक ज्ञान देणाऱ्या ठिकाणी पाठविणे अत्यावश्यक आहे .