औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मिळाले पूर्णवेळ प्राचार्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व राळेगावकरांनी केले समाधान व्यक्त


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मागील बऱ्याच दिवसापासून पूर्णवेळ प्राचार्य नसल्याने येथे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून यवतमाळ येथील शासकीय तंत्र माध्यमिक येथे कार्यरत असलेले सहाय्यक अभियांत्रिकी अधीक्षक पी.पी.पवार यांची राळेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पूर्णवेळ प्राचार्य म्हणून नियुक्ती दिली असल्याने येथील प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच राळेगावकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
येथील संस्थेत काही दिवसांपूर्वीअसलेल्या समस्ये बाबत वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या याबाबत पूर्णवेळ आलेल्या प्राचार्यांनी अखेर बातमीची दखल घेत येथील असलेल्या समस्यां मार्गी काढल्या असून असलेल्या समस्या लवकरच पूर्ण करणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.
मागील बऱ्याच दिवसा पासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कारभार प्रभारी प्राचार्य च्या भरवशावर सुरू होते,या प्रभारी प्राचार्या कडे,एकाच वेळी दोन, किंवा तीन संस्थेचे कार्यभार असल्याने त्यांना प्रत्येक ठिकाणी पूर्ण वेळ देता येत नव्हता त्यामुळे येथे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या ना धड पिण्याचे पाणी ना धड स्वच्छता गृह तर संस्थेच्या सभोवताल मोठमोठी झाडे झुडपे असे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या तसेच संस्थेतील कारभारही ढेपाळला होता.
संस्थेत शिक्षक नियमित वेळेवर येतात की नाही शिक्षक विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवतात की नाही शिक्षकांना येणाऱ्या अडचणी कोण सोडवणार,विद्यार्थी शिक्षकांना जुमानत नसतील तर त्यांची तक्रार कुणाकडे करावी ,अति महत्वाच्या कागदपत्रावरील स्वाक्षरी विद्यार्थ्यांना तातडीचे लागणारे कागदपत्रे आणि त्यावरील स्वाक्षरी अशा अनेक समस्या सोडविण्या करिता संस्थेच्या कार्यालयात पूर्ण वेळ प्राचार्य असणे अत्यंत आवश्यक आहे
मात्र वरिष्ठ कार्यालयाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला यवतमाळ येथील शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालयातील सहाय्यक अभियांत्रिकी अधीक्षक पी. पी. पवार यांची पुर्णवेळ प्राचार्य म्हणून नियुक्ती केली असून त्यांनी ४ सप्टेंबर २०२३ ला रुजू झाले असता त्यांनी लगेच संस्थेतील रेंगाळलेली कामे हाती घेतली असून परिसर स्वच्छतेला सुरुवात केलेली आहे.

प्रतिक्रिया
संस्थेत असलेल्या समस्या पूर्णपणे मार्गी लावून प्रशिक्षणार्थ्यांना सर्व प्रकारच्या उत्तम सुविधा जसे शुद्ध पिण्याचे पाणी,स्वच्छ स्वच्छतागृह,निरंतर प्रशिक्षणासह सुंदर परिसर आदी गोष्टी लवकरच उपल्बध करून देण्याचे आश्वासन दिले असून सर्व राळेगावकरांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


प्राचार्य
पी.पी.पवार औद्योगिक प्रशिक्षण संस्था राळेगाव जि यवतमाळ