राजीव गांधी कला महाविद्यालय येथे क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथील राजीव गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, येथे दिनांक 4 मार्च ते 6 मार्च पर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या प्रशिक्षणा करिता पहिला टप्पा आयोजित करण्यात आला होता, यामध्ये राळेगाव तालुक्यातील 80 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले. तर या प्रशिक्षणाचे सुलभक व मार्गदर्शक म्हणून विनोद चिरडे, राजकुमार तागडे, शंकर मोहुर्ले, कु.अमृता वाघमारे, कु.अश्विनी पाळेकर, प्रशांत चांदोरे, दीपेश शेंडे यांनी कार्य केले. तर प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून प्रविण देवकते यांनी काम पाहिले.याप्रसंगी राळेगाव तालुक्यातील जि.प. व अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यवतमाळ च्या प्रा.डॉ.कु.किरण रापतवार मॅडम व प्रा. ठोकळ यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
तालुका प्रशिक्षण कार्यकामाचे दिनांक 4 मार्च रोजी उटघाट्न राळेगाव तालुका गटशिक्षणाधिकारी चंद्रभान शेळके यांनी केले. तर प्रशिक्षणाच्या समारोपाचे प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ .एस.व्ही.आगरकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून प्राचार्या यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचा राळेगाव तालुक्यातील 80 शिक्षक प्रशिक्षणार्थिनी लाभ घेतला. या प्रशिक्षणासाठी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने व पंचायत समिती शिक्षण विभाग तथा डायट यांच्या वतीने 4 ते 6 मार्च पर्यंत राळेगाव येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्ता ९ ते १२ वी पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.तर याच प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा दिनांक 11 मार्च ते 13 मार्च रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.त्यामुळे राळेगाव तालुक्यातील सर्व जि. प. व अनुदानित शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा अशी माहिती यावेळी प्रशिक्षण समन्व्यकानीं केली आहे….