
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात सध्या पक्ष प्रवेशाचा धुमधडाका जोरात सुरु असून प्रवेश करणाऱ्यांचा जोर भारतीय जनता पार्टीत जास्त प्रमाणात असतानाच दिनांक 26/10/2025 रोज रविवारला यवतमाळ येथील नियोजित कार्यक्रमात राळेगाव येथील वर्मा परिवारातील भारतीय जनता युवा मोर्चाचे राळेगाव तालुका उपाध्यक्ष सागर जगदिश वर्मा या तरूण नेतृत्वाने आपल्या युवा कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश केला असून सागर वर्मा यांचा परिवार गेल्या तीन पिढ्यांपासून भारतीय जनता पक्षात एकनिष्ठ होऊन पक्ष वाढीसाठी कार्य करीत असतांना अचानक झालेला प्रामाणिक कार्यकर्त्यांचा प्रवेश हा इतर कार्यकर्त्यांना काहीतरी संदेश देऊन जात असून निश्चितच अचानक झालेल्या प्रवेशामुळे प्रामाणिक आणि एकनिष्ठ निष्ठावान कार्यकर्त्यांची पक्षात कुचंबना तर होत नाही ना,अशी चर्चा तालुक्यात सुरू असून अजून काही बाकी प्रवेश आहे का याकडे तालुक्यातील पक्षाच्या लोकांचे लक्ष लागले आहे.
