
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सरकारी शाळा दत्तक देण्याच्या निर्णयाविरोधात संभाजी ब्रिगेडने जनजागृती चालविली आहे. दरम्यान, वडकी पोलीस ठाण्यामार्फत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदनही पाठविले आहे.तालुकाध्यक्ष शाहरुख मो. शफी शेख यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड व ग्रामस्थानी २ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता जनजागरण रॅली काढली. शासनाने राज्यातील ६२ हजार शाळा ‘दत्तक’ देण्याच्या गोंडस नावाखाली शाळांच्या खासगीकरणाचा डाव आखला आहे. हा कुटील डाव नागरिकांना लक्षात आणून देण्यासाठी ही जनजागृती केली. गोरगरिबांच्या हक्काचे शिक्षण संपवित आहे व अप्रत्यक्षपणे शिक्षण बंदी करीत असून महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, फातिमा शेख, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या महापुरुषांच्या धोरणांचा विसर सरकारला पडला आहे. शासनाने शाळा दत्तक देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे निवेदन वडकी पोलीस ठाण्यामार्फत देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष शाहरुख मो. शफी शेख, शिवम वाघाडे, विकास केराम, समीर सातघरे, महेश खडसे, प्रमोद बोबले, नागेश तोडासे, शुभम पेंदोर, शरीफ शेख बबलू शेख, सोहेल पठाण, राजश्री केराम, शीला जंगीलवार, दुर्गा पेन्दोर, पपीता केराम, सुलोचना केराम, शशीकला केराम, प्रेमिला केराम, वंदना केराम, नीलिमा केराम उपस्थित होते.
