
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
भारतीय जैन संघटना जिल्हा संपर्क दौरा अभियाना अंतर्गत भारतीय जैन संघटना विदर्भ अध्यक्ष प्रवीण तातेड उपाध्यक्ष डॉ शेखर बंड ,जिल्हाध्यक्ष (पूर्व) संदीप मूनोत,जिल्हाध्यक्ष (पश्चिम) महेंद्र बोरा यांचा उपस्थितीत आगामी दोन वर्षासाठी कार्यकारणी गठित करण्यात आली असून राळेगाव तालुका जैन संघटनेच्या अध्यक्ष पदी भूषण दिनेश बोथरा तर सचिव दर्शन रमेशचंद मुनोत तसेच महिला अध्यक्ष सौ. धनश्री अमित गांधी सचिव सौ.पुनम अंकित कटारिया यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्हा कार्यकारणी मध्ये वृषभ मनोजकुमार धोका व जिल्हा कार्यकारणी महिला सौ दर्शना अमनकुमार छोरीया यांची तर विदर्भ कार्यकारणी सदस्यपदी एडवोकेट हर्षद पारसमलजी छोरीया यांची सर्व संमतीने निवड झाल्याचे जिल्हाध्यक्ष संदीप मुनोत यांनी घोषित केले. विदर्भ अध्यक्ष प्रवीण तातेड यांनी संघटने च्या कार्य बाबत उपस्थितांना माहिती दिली त्याच प्रमाणे विदर्भ उपाध्यक्ष डॉ.शेखर बंड यांनी आगामी दोन वर्षात भारतीय जैन संघटनेच्या वतीने कोणकोणते कार्यक्रम घेण्यात यावे तसेच वृक्ष लावा वृक्ष जगवून पर्यावरण समतोल साधावा याबद्दल मार्गदर्शन केले.याप्रसंगी स्वप्नील भंडारी जैन श्रावक संघ रालेगांव अध्यक्ष कांतिलालजी बोथरा, उपाध्यक्ष सुभाषजी गुंदेचा,मोहनलालजी गांधी,कीर्तिकुमार बोरा विनयजी मुनोत,संजयकुमार धोका, जितेश चोरड़िया अमन छोरीया, राहुल गांधी आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी संचालन विनय मुनोत यांनी केले तर आभार प्रदर्शन
श्रावक संघ राळेगांव
यांनी केले.
