
प्रतिनिधी:प्रवीण जोशी
यवतमाळ
गेल्या अनेक दिवसापासून असे मनोरंजक क्रिकेटचे खुले सामने झाले नसल्यामुळे तरुणांची नाराजी होती पण ती नाराजी मॉर्निंग क्रिकेट क्लब ने आयोजन करून दूर केली आणि भव्य खुल्या टेनिस क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले व या ठिकाणी चौकार आणि षटकार ची बरसात पाहायला मिळाली प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये द्वितीय पारितोषिक 41 हजार रुपये तृतीय पारितोषिक 31 हजार रुपये आणि चतुर्थ पारितोषिक 21 हजार रुपये अशा पद्धतीने ठरवण्यात आले होते.त्यात एचपियल हदगाव विरुद्ध ड्रीम इलेव्हण यवतमाळ यांच्यात फायनल सामन्याची रंगत झाली त्यात यवतमाळ संघाने प्रथम पारितोषिक पटकाविले तर द्वितीय पारितोषिक एचपीयल संघ हदगावने पटकाविले तृतीय पारितोषिक हिना क्रिकेट क्लब उमरखेड, चतुर्थ पारितोषिक मॉर्निंग क्रिकेट क्लब ढाणकी संघाने पटकाविले मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. व सन्मान चिन्ह देऊन विजई संघाचा गौरव करण्यात आला.क्रिकेट सामना चांगला ,चुरशीचा व्हावा व कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता सामने शांततेत पार पडावे या करीता बीट जमदार मोहन चाटे व बिटरगाव पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी रवी गीते यांचे विशेष सहकार्य लाभले.चाटे साहेबांनी क्रिकेट सामन्यात सहभाग घेत मॉर्निग क्रिकेट संघासोबत खेळत तसेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉमेंट्री करत प्रेक्षकांची मने जिंकली टेनिस क्रिकेट सामन्याचे आयोजन जॉनटी विनकरे ,नगरसेवक बाळाभाऊ योगेवार, संभाजी गोरटकर, सतीश चव्हाण, नागेश रातोळे, मनोज बन, मुकेश ईरनलवाड,संबोधी गायकवाड ई केले.
