
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
नागपूर मध्ये होवू घातलेल्या हिवाळी अधिवेशन आणि नव नियुक्त सरकार १६ डीसेबर सुरू झाले परंतु पहिल्याच दिवशी सरकार च्या विरोधात निषेध, ठिय्या आंदोलन, आणि उपोषण चे मंडप यशवंत स्टेडियम वर सजलेली होती.
अधिवेशाचा पहिलाचं दिवस यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा क्षेत्रातील मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी विविध समस्या चे निवेदन देऊन नौटंकी सरकार चा निषेध नोंदवला या धरणं आंदोलनात प्रामुख्याने काही महत्त्वाच्या मागण्या चे निवेदन १) शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणार आहे की नाही? २) विदर्भातील २३०० शे गावं ओसाड पडली आहे यांच्या हाताला कामं देणार की नाही ? ३) नागपूर करार नुसार वर्षातुन एकदा विधिमंडळ अधिवेशन कमित कमी तीन आठवडे झाले पाहिजे आणि विदर्भातील शेतकरी, असेल,पिडीत असेल बेरोजगारी आणि महागाई या विषयावर प्रश्नोत्तरी चर्चा खरंच या अधिवेशनात आपण करणार आहात काय अशा प्रश्नांचा भडीमार मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी धरणे आंदोलन जबाबदारी ने प्रश्न मांडला. या धरणं आंदोलनांचे नेतृत्व ॲड वामनराव चटप साहेब, माजी आमदार मा उपेंद्र जी शेंडे साहेब माजी आमदार,मा डॉ श्रीनिवास खांदेवाले साहेब ( अर्थतज्ञ ) मा अरुणभाऊ केदार राष्ट्रीय अध्यक्ष जय विदर्भ पार्टी मा मुकेश मासुरकर अध्यक्ष, युवा आघाडी विदर्भ राज्य आंदोलन समीती आणि मा कृष्णा जी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ यांच्या नेतृत्वाखाली हजारो विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते “‘ हिवाळी अधिवेशन आणि नागपूर करार ” विदर्भातील शेतकरी, शेतमजूर, तरुण बेरोजगार युवक, कंत्राटी कामगार सर्व स्तरातील लोकांनी समजून घेतले पाहिजे आणि स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती चे हात मजबूत केले पाहिजे.या विधीमंडळ अधिवेशनात निषेध नोंदविण्यासाठी अकरा ही जिल्ह्यातील हजारो विदर्भवादी सहभागी झाले होते प्रामुख्याने मा मधुसूदन कोवे गुरुजी, गोविंद चव्हाण, कृष्णा भोंगाडे प्रेमा पत्रिवार, श्रीधर ढवस सुदाम राठोड गणेश पुसाम मंजुषा तिरपुडे, लक्ष्मी लिचडे राजेंद्र सतई, गुलाबराव धांडे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
