
यवतमाळ
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
दिनांक १० मे शुक्रवार रोजी महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात ढाणकी शहरातील शंभू महादेवाचे मंदिर असलेल्या बस्वलिंग स्वामी मंदिरासह अनेक ठिकाणी साजरी करण्यात आली. शोभायात्रा काढून वंदन करण्यात आले. यावेळी ट्रॅक्टर हार फुलांनी सजविण्यात येऊन त्यावर महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती.बस्वलींग महादेव मंदिर परिसरातील प्रांगणात महिला मंडळींनी सुंदर रांगोळ्या सुद्धा काढल्या होत्या .
ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी न्यायाच्या रूपाने एखादा तरी युगपुरुष अवतरतो अन्याय चालत असलेल्या वाईट चालीरीती, रुढी, आणि परंपरा यांचा बिमोड न्यायाचे जीर्णोद्धार खुले करून वसुधेववरील वाढत असलेल्या अन्याय स्वरूपातील बाबींचा परित्याग करण्यासाठी महात्मा यांचा जन्म होतो त्यातीलच एक म्हणजे जगत वंदनीय महात्मा बसवेश्वर तत्कालीन काळात स्त्रीला सती जाण्याची प्रथा होती. केशव पण करावे लागायचे अशा नानाविधी परंपरेने समाज व्यवस्था एका श्रीफळाच्या वृक्षाप्रमाणे त्याची उंची होती तर वैचारिक खोली अनंत होती यावेळी महात्मा बसवेश्वरांनी स्त्री शक्तीचे महत्त्व विशद करून शंभो शंकर सुद्धा स्त्रीला एक शक्तीचे वाहिनी मानतात म्हणूनच त्यांच्या प्रतिमेत अर्धनारी नटेश्वराचे विश्वरूप असते आणि हेच विचार पुढे महात्मा बसवेश्वरांनी प्रचलित प्रज्वलित प्रवर्धित प्रवर्तित केले हे विशेष.
प्रथम यावेळी महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात शंखनाथ करून शंभू महादेव यांना प्रिय असलेल्या ओम नमः शिवाय या मंत्राच्या जपाचे पठण करण्यात आला नंतर पिंडीवर बेलपत्र वाहून अभिषेक करण्यात आला व “जयतु जय देवा सदाशिव आरती महादेवा” ही आरती म्हणून महादेवाच्या चरणी भक्तगण लीन झाले व नंतर महात्मा बसवेश्वर यांची सुंदर शोभायात्रा काढण्यात आली होती “हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ गंगा” व “जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो” अशा स्वामी बसवेश्वर यांचे आराध्य असलेल्या दैवत शंभू महादेव बद्दलच्या उद्घघोषणा ऐकायला येत होत्या शहराच्या मुख्य मार्गावरून ही शोभायात्रा निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत गेल्या नंतर यावेळी समाज बांधवांनी अखंड हिंदुस्तानचे छत्रपती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व अशा प्रकारे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समाज बांधवातील युवक, युवती,माता भगिनी व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला यावेळी ढोल ताशाचा गजर बघायला मिळाला तर महिला मंडळींनी भजन गायन करून आपली भक्तियुक्त श्रद्धा प्रगट केली व जुन्या बसस्थानक परिसरात फटाक्याची आतिषबाजी सुद्धा करण्यात आली.
