
बिटरगांव बु// प्रतिनिधी//शेख रमजान
अपर आयुक्त अमरावती यांनी दि 30 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात ब्राम्हणगाव येथील सरपंच अपात्र घोषित केल्या प्रकरणी सरपंच परमात्मा गरुडे यांनी ग्रामविकास मंत्रालयात दाखल केलेल्या अपिलावर अपर आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला पुढील आदेशा पर्यन्त स्थगिती दिली आहे .त्यामुळे सरपंचपदी परमात्मा हे पुन्हा विराजमान झाले आहेत .
ब्राम्हणगाव येथील सरपंच परमात्मा गरुडे यांनी पदाचा दुरुपयोग , कर्तव्यात कसूर व गैरवर्तणूक केल्याचे सिद्ध झाल्याने येथील ग्राम पंचायत सदस्य शेख खदीर शेख हानिफ यांच्या तक्रारीवरून महा. ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 39 (3) नुसार अपर आयुक्त अमरावती यांनी दि 30 नोव्हेंबर 2023 रोजी अपात्र घोषित केले होते . अपर आयुक्त अमरावती यांच्या आदेशाला आव्हान देत सरपंच परमात्मा गरुडे यांनी ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दि 8 डिसेंबर 2023 अपिल दाखल केले होते . दाखल प्रकरणाची सुनावणी दि .17 जानेवारी रोजी मुंबई येथून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आयोजित करण्यात आली होती . सुनावणी दरम्यान सर्व संबंधितांनी आपापली बाजु मांडली व सर्वांचे म्हणणे ऐकुन घेण्यात आल्यानंतर ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सदर प्रकरणात कामकाज करीत असतांना प्रशासकिय अनियमितता झाल्याचे दिसून येते तसेच अपिलार्थी यांचे म्हणणे तपासून घेणे आवश्यक असल्याचे म्हटले . व प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन अपर आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांचे दि . 30 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आदेशास पुढील आदेशा पर्यन्त स्थगीती देण्यात आली . अपर आयुक्तांच्या आदेशाला ग्राम विकास मंत्रालयाची पुढील आदेशापर्यन्त स्थगिती मिळाल्यामुळे पुन्हा
सरपंचपदी गरुडे हे विराजमान झाले .त्यामुळे त्यांच्यावरील जनतेचे प्रेम हे ओसंडून वाहत होते. त्यांनी आतापर्यंत केलेली कामगिरी लक्षनिय असून त्यांनी कार्य तत्पर राहून आपली कामगिरी कशा प्रकारे बजावली हे जनतेच्या प्रेम, व उत्साहावरून दिसून येत होते. ‘कर्म तेरे अच्छे हो तो किस्मत तेरी दासी है’ त्या प्रमाणे नेहमी कर्म चांगले असल्यास त्याचे फळ सुद्धा चांगलेच मिळते.हे या वरून स्पष्ट होते. त्यांना यावेळी गावातील ग्रामस्था तर्फे भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. व फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला . चौकट माझ्यावर विरोधकांनी जे आरोप केलेले आहेत ते त्या आरोपात काहीही तथ्य नसून सर्व आरोप हे बे बुडाचे आहेत. नेहमी सत्याचा विजय होत असतो. त्याप्रमाणे लवकरच दूध का दूध व पाणी का पाणी होण्यास वेळ लागणार नाही. सत्य काय आहे ते लवकरच जनतेपुढे येणार असून. मी नेहमी सत्याचीच बाजू घेऊन चालणारा माणूस असून. दि.30 नोव्हेंबर 2023 रोजीचे आदेशास स्थगिती देण्यात आली असून. मला एक प्रकारचा दिलासा मिळालेला आहे. आणि राहिलेली उर्वरित लढाई ही सत्याच्याच बाजूंनी होणार असून. पूर्णपणे निकाल हा माझ्या बाजूनेच लागेल. कितीही सत्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला तरी सत्यहे पराजित होत नसते.हे सत्य असून काळ्या दगडावरची रेघ आहे.सत्य काय आहे ते जनतेपुढे दिसून येत आहे. असे प्रतिपादन सरपंच गरुडे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकाराशी बोलताना संबोधित केले.
