
भद्रावती तालुक्यातील माजरी गावात सरपंच आणि ग्राम विकास अधिकारी संगणमत करून
निकृष्टदर्जाचे विकास कामे करुन मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला आहे .मागील दोन
वर्षापासून मासिक सभेत चौकशीची मागणी करीत आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे असा आरोप माजरी येतील सामाजिक कार्यकर्ता सतिश कुडुतूला यांनी पत्रपरिषेदीत केला आहे . १० दिवसात चौकशी करून कारवाई न झाल्यास माजरी गाववासियांना समवेत आंदोलन करू असा निर्वाणीचा इशारा यावेळी त्यांनी दिला.सरपंच छाया जंगम व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गणवीर या दोघांनी गेल्या दोन वर्षांपासून अनेक कामे निकृष्ट दर्जाचे करून त्या माध्यमातून चांगलीच माया जमवली आहे. विरोधकांच्या वॉर्ड मध्ये कामे न करणे, वॉर्ड क्रमांक ५ मध्ये गेल्या २ वर्षांपासून नाली सफाई,रस्ते,पथदिवे, या कामाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून येते तयार केल्या गेलेल्या रस्ते व नाल्या काही दिवसातच वाहून गेल्या.प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपयाचे खरेदी केलेले अनेक सोलर लाईट बंद पडलेली आहे. अनेकदा मासिक सभेत सांगून सुद्धा लक्ष दिल्या जात नाही.अशा प्रकारे जनतेच्या पैशाची उढळपट्टी केल्या जात आहे. या ग्रामपंचायतीला वेकोलिद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
त्यामूळे या ग्राम पंचायतीने आद्यपही खासगी नळाद्वारे पाणी पुरवठयाची पर्यायी व्यवस्था केली नाही. त्याऐवजी प्रत्येक वॉर्डमध्ये कूपनलिका दिल्या. त्यातील अनेक बंद पडल्या आहेत.वेकोली कडून पाणी पुरवठा न झाल्यास ग्रामस्थांना २ ते ३ किलोमीटर लांबुन पाणी आणावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. रोगराई पसरू नये म्हणून खरेदी केलेले औषधी फवारणी यंत्र धूळ खात पडले आहे. औषधाचा फवारणी झाल्याने डासांचे प्रमाण वाढून मलेरिया सारखे रोगाचे प्रमाण वाढत आहे.या सर्व कामात १४ व १५ वित्त आयोग,सामान्य निधी आणि ईतर माध्यमातून मिळणाऱ्या निधीचा गैरवापर झाला असून त्याद्वारे झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेवटी सतिश कुडुतूला यांनी केला. या पत्रपरिषदेला सतिश कुडुडुला व अवदेश भारती उपस्थित होते.
