
पोहणा येथे प्राचीन राममंदिर आहे,पुरातन मंदिराची पड़झड झाली असून मंदिर समिति तसेच गावकऱ्यांतर्फे येथील प्राचीन राममंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविल्यानंतर काल दि.१८ रोजी आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते या जीर्णोद्धार बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सभापती माधवरावजी चंदनखेडे , हिंगणघाट पंचायत समितीच्या सभापती सौ.शारदाताई आंबटकर, माजी सभापती गंगाधरराव कोल्हे, रामचंद्रजी पवार, दौलतराव जीवतोडे, ह.भ.प.मयुरजी महाराज, भाजपा समुद्रपूर तालुकाध्यक्ष संजयजी डेहणे,भाग्येशजी देशमुख, सौ.सुरेखाताई शिंदे, सौ.कविताताई कुमरे, पंजाबराव पानवटकर , त्रिलोकजी नाहर, सुधाकरराव कोंबे , प्रकाशजी देशमुख, विशालजी देशमुख , अमोलजी पवार, गजाननराव बारापात्रे, विनायकराव कोंबे , अमोलजी सोनटक्के, विजयजी टिकले, विलास दाते, गजाननराव चरडे, महादेवराव बारापात्रे … इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी आमदार समिरभाऊ कुणावार यांनी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन जीर्णावस्थेतील श्रीराम मंदिराच्या पुनर्निर्माण कार्याचे कौतुक करीत स्वतःच्यावतीने मंदिर पुनर्निर्माण कार्यासाठी सुमारे १ लक्ष रुपये देण्याची घोषणा केली.
