रिधोरा येथील सर्वोदय विद्यालय शाळेला उप शिक्षण अधिकारी यांची भेट

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील सर्वोदय विद्यालय शाळेला
माध्यमिक उप शिक्षणाधिकारी प्रदिप गोडे यांनी आकस्मिक भेट दिली सदर शाळेचे मुख्याध्यापक श्री टी. झेड. माथनकर यांनी गोडे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर माध्यमिक उप शिक्षण अधिकारी प्रदीप गोडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच मार्गदर्शन केले. एकंदरीत शालेय प्रशासन व स्वच्छ परिसर पाहून गोडे यांनी आनंद व्यक्त केला. तसेच मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला व मार्गदर्शन आणि सूचना केल्या. वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी विशेष मार्गदर्शन केले.यावेळी शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.