सोनामाता हायस्कूल चहाद येथे प्रजासत्ताक दिन साजरा

सहसंपादक: रामभाऊ भोयर

डॉ य.मो.दोंदे सार्वजनिक शैक्षणिक ट्रस्ट कळंब द्वारा संचालित सोनामाता हायस्कूल चहाद ता.राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे ७५ प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेवराव शेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक अनिल धोबे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे राजेंद्र चामाटे,शंकर बोरकुटे विजय गवारकर,भैयाजी सिडाम, शाळेतील शिक्षक प्रकाश चिव्हाणे, बंडूजी शिवणकर, राजेंद्र कांबळे,सतीश सावंत,अतुल दांडेकर,गोवरदीपे मॅडम गावंडे मॅडम, शिक्षकेत्तर कर्मचारी देवानंद सोनोने, प्रथमेश राऊत, विद्यार्थी, पालक उपस्थित होते यावेळी शाळेचे लिपिक राजकूमार झोटींग यांनी सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली.