
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर भाषणे दिली.. तसेच राळेगाव येथील शिवतीर्थ छत्रपती शिवाजी जन्मोत्सव शाळेतील विद्यार्थी नाटिकेस दुसरा क्रमांक मिळाला असून… शाळेतील शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे प्रमुख वक्तता म्हणून विनोद तायडे, आनंद घुगे यांनी आपले विचार व्यक्त केले… शाळेतील या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सूचित बेहरे, मनीषा इखे हे उपस्थित होते… या कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन कु सानिका जवंजाळ, हिने केले…
