
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, व शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढविता येईल याला अनुसरून सीता माता मंदिर सभागृह रावेरी येथे आयोजत कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेत शेतकऱ्यांची आजची परिस्थिती वाढती महागाई आणि बेरोजगारी नैसर्गिक वातावरणात झालेला बदल आणि त्यामुळे शेतीवर आलेले संकट त्यातून शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या यातून सामाजिक सहभागातून काही मदत आणि मार्गदर्शन, उपाययोजना करता येतील का? तसेच बदलत्या काळात शेतकऱ्यांचे गट तयार करून गाव तसेच तालुका स्तरावर शेत मालावर प्रक्रिया करून उद्योग व्यावसायिक उपक्रम सुरू करता येतील का? शेतकऱ्यांची आजची परिस्थिती सुधारणसाठी काय काय आवश्यक आहे या बाबत कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.गावागावात या विषयावर चर्चा करण्यात यावी व प्रत्येक गावाची समस्या गावकऱ्यांच्या ऐक्यातून कशी सोडविता येईल हा विचार गाव प्रमुख सरपंच यांनी गावात जाऊन गावकऱ्यांचे ऐक्य निर्माण करावे व ही मोहीम प्रत्येक गावाची व्हावी यासाठी या कार्यशाळेत १५ गावाचे सरपंच उपस्थित होते या १५ सरपंचनी तालुक्यातील सर्व सरपंच पुढील कार्यशाळेला उपस्थित राहणार यासाठी नियोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यशाळेला अनेक स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी मुंबई पुणे नाशिक यवतमाळ येथून उपस्थित होते, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या निकाली काढणे करीता आर्थिक मदत करण्याचे मानस असल्याचे विषद केले.नाम फाऊंडेशन रिलायन्स फाऊंडेशन,आर्ट ऑफ लिव्हिंग
चे प्रतिनिधी, विचार विकास संस्था वरोराचे किशोर चौधरी, निखिलेश सावरकर, प्रमोद कांबळे, हरीश भगत) संस्थेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.कार्यशाळेत ३९ शेतकरी ५ एनजीओ
प्रतिनिधी १५ सरपंच यांनी उपस्थिती लावली होती पांडुरंग लोखंडे, गजानन झोटींग, किशोर धमंदे ऍड भूमिका सावरकर, सुरेश आगलावे कुमार सुलभेवर वैभव पंडित शेखर तेलंगे, कुणाल इंगोले, भूषण उंडे दिनेश बोरेकर नितेश हिवरकर अशोक सावरकर निलेश भोयर आदित्य पिंपरे नारायण इंगोले हर्षद पिंपरे बाबाराव घोडे, विजय मोहिते , भाऊराव वऱ्हाडे , रुपेश कुडमेथे, रामभाऊ कुदमेथे दिलीप भुडे
वैभव गवरकर दिनेश बोरेकर नरेश मडावी मोहन नारडवर नितीन गवरकार गजानन तोडासे असे अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.कार्यशाळेच्या आयोजनासाठी युसुफ सैयद , गंगाधर घोटेकर यांनी पुढाकार घेतला कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता रावेरीचे सरपंच राजेंद्र तेलंगे यांनी पुढाकार घेतला.
