
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
खैरी येथे वार्ड नंबर २ इंदीरागांधी नगर बेघर वस्ततीला चाळीस वर्षे होऊनही आठ अ पट्टे देण्यात आलेले नाही . याकरीता वार्ड नंबर २ इंदीरागांधी नगर मधील सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ माहुरे व सहकार्यांनी दोन वेळा उपोषण पण केले होते. पण उपोषण सोडण्याकरीता आलेले राळेगाव तहशीलचे तहशीलदार साहेबांनी तुम्हाला दोन महिण्यात तुमच्या नावाचे आठ अ पट्टे देण्यात येईल असे लेखी आश्वासन पण दीले आहे. परंतु आता ऊपोषणाला ऐक वर्ष होत चालले आहे. पण शासनाचे अजुनपर्यत दोन महीणेच झालेच नाही आहे. या करीता,खैरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री विनोदभाऊ माहुरे यांनी आमदार साहेब श्री अशोकराव ऊईके सर, एस.डी ओ.काळे साहेब, तहशीलदार कानडजे साहेब यांना आठ अ पट्टया बद्दल वेळोवळी विचारणा केली असता होय देतो होय देतो असे वेळकाढूपणा करीत आहे. पण आता तरी लोकप्रतिनिधीने आणि महसुल प्रशासनाने लवकरात लवकर या सर्व प्लाट धारकांना आठ अ पट्टे वाटप करण्यात यावे अशी या सर्व प्लाट धारकांची मागणी आहे
