
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ग्राम विकास कार्यकारी सहकारी संस्था राळेगाव तर्फे बँक प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप ठूणे यांची अविरोध निवड करण्यात आली आहेत.. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्यामार्फत संस्थेच्या वतीने बँक प्रतिनिधीची निवड करण्यासंदर्भात सूचना होत्या त्या अनुषंगाने मासिक सभेमध्ये बँक प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप ठूणे यांची बहूमताने निवड करण्यात आली यावेळी प्रदीप ठूणे यांचे अभिनंदन सुद्धा करण्यात आले सभेला संस्थेचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे उपाध्यक्ष राजेश काळे संचालक जानराव गिरी, विनायक नगराळे, कृष्णराव राऊळकर, तातेश्वर पिसे, गजानन पाल,प्रभाकर राऊत, अशोक पिंपरे, विनोद नरड , नितीन महाजन, विभा गांधी, ज्योती डाखोरे ,प्रकाश मेहता आदी उपस्थित होते…
