
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे येथील मोक्षधाम (स्मशानभूमीत) श्री आदिशंकराची भव्य दिव्य मुर्ती बसविण्यात आली आहे.या पद्धतीची आदिशंकराची मुर्ती कर्नाटकातील ईशा फौंडेशनच्या नंतर किन्ही जवादे येथेच आहे.तसेच भव्य त्रिशूळ (बाण) उभारण्यात आला आहे.मुर्तीसाठी शेड व सभामंडप तयार करण्यात आला आहे.परिसरात वृक्ष लागवड करून संवर्धन केले आहे.लोकाना बसण्यासाठी सिमेंट बेंच लावण्यात आले आहेत.यातिल बरिचशी कामे लोकवर्गणीतून केली आहे. येत्या महाशिवरात्री ला मोठा उत्सव साजरा होत आहे.यामधे आदिशंकराची महापुजा, भजन, पारंपारिक महादेवाचे गाणे हे कार्यक्रम आयोजित केले आहे.तरि भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुधीर पाटील जवादे सरपंच व संयोजकांनी केले आहे.
