
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील स्मशानभूमीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती हे लक्षात घेऊन येथील सदैव समाज कार्यात मग्न असणारे सर्वपक्षीय मॉर्निंग पार्क ग्रुपने आपल्या स्तुत्य उपक्रमातून पिण्याच्या पाण्याकरिता आरो प्लांट मिळवला आहे…. येथील प्रसिद्ध उद्योजक तुलसी इंडस्ट्रीचे संचालक संजय घीया यांनी आरो प्लांट दान स्वरूपात दिला आहे त्याचे रीतसर उद्घाटन आज मॉर्निंग पार्क ग्रुपच्या सदस्यांच्या वतीने संजय घीया व विनोद नरड यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी तुलसी इंडस्ट्रीचे संचालक संजय घीया यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की राळेगाव परिसर ही माझी कर्मभूमी राहिली आहे येथील शेतकरी वर्ग व सर्व नागरिक करिता सेवा करण्याची संधी मिळाली त्याकरिता मी मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो असे मत व्यक्त केले याप्रसंगी स्मशानभूमी परिसरा करिता राजू गांधी विनोद नरड अशोक अडगुलवार वामनराव गिरी चंदू भासपाले यांनी स्मशानभूमी करता बसण्याची व्यवस्था म्हणून बेंचेस दान केले अशा विविध दानाच्या स्वरूपातून व लोकसभागातून स्मशान भूमी परिसरात अद्यावत बसण्याची व्यवस्था मनमोहक फुलांची झाडे ऑक्सीजन रुपी विविध वृक्ष हिरवे कंच लॉन आकर्षक रंगरंगोटी यामुळे , स्मशानभूमी परिसराचा कायापालट झाला आहे याप्रसंगी भारत ठूणे संजय पोपट जानराव गिरी प्रदीप ठूणे सुनील भामकर ॲड अल्पेश देशमुख विवेक गवळी बबलू सय्यद प्रफुल कोल्हे सचिन चौव्हाण. सुरेश नेहारे अशोक अडगुलवार अमोल शिंदे आशिष इंगळे रवी निळ राजेंद्र नागतूरे रामकृष्ण भोयर प्रभाकर रामगडे चंदू भासपाले नज्जू शेख रफिक शेख खुशाल शिंदे किशोर सरदार अखिल धांदे यांची उपस्थिती होती
