
वजन मापात फसवणूक होत असल्याचा शेतकऱ्यांचा व ग्राहकांचा आरोप
प्रतिनिधी-प्रवीण जोशी
शहरासह ग्रामीण भागात इलेक्ट्रॉनिक वजन काटे आडत दुकानासह इतरत्र ठिकाणी आले आहेत. त्या वजन काट्यांची वर्षातून एक वेळेस पडताळणी होणे गरजेचे असते पण अद्याप अनेक व्यापाऱ्यांच्या काट्याची पडताळणी झाली नसल्याचे वजन काट्याच्या मापात पाप होत असल्याची चर्चा शेतकऱ्यात तसेच बाजारात येणाऱ्या ग्राहकाकडून केल्या जात आहे. वैध मानसशास्त्र यंत्रणा ढाणकी शहरात फिरकत नसल्याने अनेकांचे भले होत असताना दिसून येत आहे. सध्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील पीके निघायला सुरवात झाली असून व्यापारी ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा कापूस तूर सोयाबीन खरेदी केल्या जाते तसेच मोठमोठ्या दुकानातून सुद्धा नागरिक माल मोठ्या प्रमाणात विक्री करीत असते त्यामुळे दुकानातील किंवा व्यापाऱ्यांचे माल घेण्याचे किंवा विकण्याचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे तपासणे नित्यांचे असून अनेकांची या वजन काट्यातून फसवणूक होत असल्याची चर्चा ऐकावयास येत आहे. त्यामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील दुकानदाराच्या इलेक्ट्रॉनिक काट्यांची तपासणी करावे अशी मागणी सर्वत्र होत आहे ग्रामीण भागातील शेतकरी शेतातील आपला माल व्यापाऱ्याला देत असताना त्याच्यावर विश्वास ठेवूनच व्यवहार करतात पण वजन काट्याच्या खेळाने अनेकांच्या डोळ्यावर पडदा आला असल्याचे दिसून येत आहे झटपट मालामाल होण्याच्या नादी अनेक जण लागले असल्याने लुटण्याचा धंदा उदयास आल्याचे बोलल्या जात आहे वैध मापन शास्त्र यंत्रणेचे अधिकारी तालुक्यात फिरकत नसल्याने वजन काट्याच्या मापात पाप वाढत असल्याचे चित्र आहे. बहुतांश ठिकाणावर वजन काट्यांची पडताळणी करून वजन मापाची तपासणी करावी अशी मागणी आता शेतकरी व ग्राहकांकडून केली जात आहे.
