वडकीतील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ,तलाठ्याची तत्काळ बदली करण्याची मागणी; आंदोलनाचा इशारा

वडकी वासियांनी वाचली जिल्हाधिकाऱ्यांकडे तलाठ्याची गाथा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

वडकी येथे कार्यरत असलेल्या व्ही.बी.कोडापे या तलाठ्याची तत्काळ बदली करून नवीन तलाठ्याची नियुक्ती करवी तसेच बँकेकडून काढण्यात आलेल्या पिक विम्याचा मोहबदला अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना त्यांनी काढलेल्या पिक विम्याचा मोहबदला मिळवून देण्यात यावा गावांतील शेतकऱ्यांशी तलाठ्याने दुजाभाव करीत रकमेचे वाटप कमी अधिक प्रमाणात केले आहेत हा अन्याय दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याच्या हक्काचा लाभ तातडीने देण्यात यावा या मागणीसह अन्य वडकी ग्राम वासियांच्या व्यथा जिल्हाधिकऱ्यांना तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून मांडण्यात आल्या आहेत.

बदली कायद्यानुसार दर पाच वर्षांनी कर्मचाऱ्यांची बदली करणे अनिवार्य ठरते. मात्र, तब्बल १२ वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत वडकीतील तलाठ्याची बदली महसूल प्रशासनाने केली नाही. सदर तलाठ्यांकडून शेतकऱ्यांना मनस्ताप होत असल्याने आता या तलाठ्याच्या बदलीसाठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहे. या तलठ्यामुळे गावात राजकीय गटबाजीचे वातावरण तयार झालेले आहे.
तसेच वडकी येथील प्रवीण रामभाऊ फुटाणे यांची आठ महिन्यापूर्वी उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निकालाची तलाठ्यांनी फेरफार न घेता पैशाची मागणी करत कार्यालयाचे आठ महिन्यांपासून चकरा मरण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे तर गजेंद्र पिपराडे यांचे शेत सर्वे नं १४/२ मधील २०१२ च्या सातबारा नुसार पोट खराब ०.२४.०० (६२०) भाग होता परंतु २०१३ च्या सतबाऱ्या नुसार पोटाखरण भाग हा दुपटीने वाढवून ०.४८.०० कोणतीही शेतकऱ्यांना पूर्व सूचना न देता तसेच कोणतेही शासकीय आदेश नसताना या तलाठ्याने आपल्या मनमर्जी कारभाराने शेतकऱ्याचे नुकसान केले असून तलाठ्याकडे वारंवार विनंती करून सुद्धा त्यांना पोट खराब भाग अजूनही कमी करून देण्यात आला नाही. या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मानसिक त्रास मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यानं कडून करण्यात येत आहे.

यामुळे वडकी येथील तलाठी हा संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून या तलठ्याची काही अधिकारीच पाठराखण करत असल्याचे वडकी ग्रामस्थामध्ये बोलल्या जात आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यावर कारवाहीचे सौजन्य अजूनही महसूल विभागाकडून दाखवण्यात आले नाही.

वडकी येथील शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी घेऊन निवेदनातून तर तोंडी अधिकाऱ्याकडे दाखल केल्या होत्या परंतु अजूनही त्या कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही किंवा चौकशी करण्यात आली नसल्याने वडकी परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. या कर्मचाऱ्यांला महसूल विभागाकडूनच पाठबळ मिळत असल्याने वडकी येथील शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे दार थोकावे लागले आहे. जिल्हाधिकारी या तलाठ्यावर काय कारवाही करतील याकडे वडकी येथील सर्व सामान्य जनतेचे नजरा लागल्या आहेत.

शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास २२ नोव्हेंबरपासून वडकी पटवारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी गणेश काकडे, जगदीश गोबाडे, नरेंद्र झिले, प्रवीप फुटाणे, गजानन पिपराडे, स्वप्नील कचवे, दिलीप कडू, जिवन गोहोकार, नितेश जोगी यासह अन्य शेतकरी व नागरिक उपस्थित होते.