

वरोरा तालुक्यातील चिकणी ग्राम पंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची मुदत संपल्याने नविन समितीचे गठन करण्यासाठी दिनांक 29 ऑगस्ट रोज सोमवार ला तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी ग्राम सभेत चिकणी ग्राम पंचायत कार्यालय येथे निवड प्रक्रिया पार पडली .या प्रक्रियेत अध्यक्ष पदी बिन विरोध चंद्रशेखर खारकर तर उपाध्यक्ष पदी प्रदीप येळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
चिकनी गावाचे सरपंच श्री.नामदेव ढेंगळे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची निवड करण्यात आली
त्यावेळी सरपंच – श्री नामदेव ढेंगळे
उपसरपंच – श्री किशोर झाडे
ग्रामसेवक – श्री गणेश मुकाले
यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांच्या सहमतीने महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे गठन करण्यात आले.
