
विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त सावतानगर,खुटवड नगर परिसरात शिस्तबद्ध संचलन काढण्यात आले.
या संचलनात शंभरहून अधिक स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाखाली चालत राष्ट्रहिताची प्रेरणा जागवली. या अभूतपूर्वक्षणी परिसरातील अनेक नागरिकांनी उपस्थित राहून भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी करत संघकार्याला अभिवादन केले.
या प्रसंगी सुधाकर भाऊ बडगुजर, हर्षाताई बडगुजर,अलकाताई अहिरे,साधना मटाले देवानंद बिरारी,संजय भामरे,पवन मटाले तसेच श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ व दुर्गा नगर मित्र मंडळाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाचं हे शतक महोत्सवी वर्ष असल्याने स्वयंसेवक परिसरातील नागरिकांमध्ये विशेष उत्साह, अभिमान आणि राष्ट्रनष्टेची जाज्वल्य भावना दिसून आली.
