इंडिया पोस्ट पेमेंट बँक प्रीमियम खाते उघडण्याचा भव्य महामेळावा,ढाणकी शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालयाचे आयोजन


प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
यवतमाळ


जवळपास सर्वच ग्रामीण भागातील लहानशा गाव खेड्यामध्ये सुद्धा पोस्ट कार्यालयाच्या शाखा असून आता आधुनिकतेच्या काळाची पाऊले उचलून पोस्ट खात्याने सुद्धा आधुनिक बाबीचा स्वीकार करून विविध नवनवीन योजना ग्राहकापर्यंत पोहोचविण्यास तत्पर दिसत आहे मागील काही वर्षांपूर्वी डाकघर हे फक्त पत्रव्यवहारासाठी एवढेच ठिकाण असायचे बहुदा तत्काळ संदेश वहनासाठी “तार” योजना पण होती अत्याधुनिक 4 G मोबाईलच्या जमान्यात ती योजना सुद्धा कालबाह्य झाली जन्म मरणाचा संदेश, नवीन लग्न झालेल्या मुलीचे पत्र माहेरी आल्यानंतर आपली मुलगी कशी आहे हे फक्त पत्राद्वारेच माहिती होत असत आणि स्वतःच्या हाताने लिहिलेल्या काही ओळी आनंद देऊन जायच्या. तो मनाला समाधान देणारा पत्र व्यवहाराचा काळ कायमचा निघून गेला तो कधी परत न येण्यासाठी शाळेला सुट्ट्या लागायच्या आधी लहान बाल गोपालांना वेध असायचे मामाच्या गावचे परीक्षा कधीपासून सुरू होणार व कधी संपणार याचा इतिश्री मांडून लहान मुले आपल्या मामांना येण्याची उत्सुकता व सूचना सुद्धा पत्राद्वारे देत असत पण ही कला सुद्धा अत्याधुनिक काळा त लुप्त झाली ती व्हिडिओ कॉलिंग च्या वेगवान पद्धतीमुळे सुद्धा बंद झाली पोस्ट खात्याने सुद्धा या जुन्या बाबी तर जपल्या शिवाय सुरक्षित ठेव म्हणून अनेक योजना पोस्ट खात्याने सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिल्या.

ढाणकी शहरातील पोस्ट ऑफिसच्या कार्यालयासमोरील मोकळ्या अशा पटांगणात भव्य दिव्य शामियाना टाकून दिनांक 31 मार्चला इंडिया पोस्ट पेमेंट बँक चे प्रीमियम खाते उघडण्याचा महामेळावा आयोजित केला होता यावेळी अनेक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केले विशेष म्हणजे एरवी खाते उघडावयाचे असल्यास भरपूर कागदपत्रे व फोटो लागत असत पण या महामेळाव्यात संबंधित ग्राहकाचे आधार क्रमांक व बोटाचा ठसा उमटून खाते उघडण्यात आले ग्राहकांनी सुद्धा यावेळी समाधान व्यक्त केले हल्ली शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यास पोस्ट कार्यालय सक्षमपणे काम करत आहे पीएम किसान, मातृत्व, योजना, घरकुल योजना, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, रोजगार हमी योजना, विहीर अनुदान, योजना, अशा योजनांची रक्कम डीबीटी द्वारे खात्यामध्ये थेट जमा सुद्धा होईल इतर बँकेत खाते उघडण्यासाठी अनामत रक्कम ठेवावी लागते पण पोस्ट कार्यालयातील खात्यामध्ये कमीत कमी रक्कम ठेवण्याची गरज नाही शून्य एवढ्या रकमेवर सुद्धा खाते कार्यरत राहील व सुरुवातीला दोनशे रुपयावर खाते काढल्यानंतर डिपॉझिट किंवा विड्रॉल या व्यवहारावर कोणत्याही प्रकारचे चार्जेस सुद्धा लागणार नाही हे विशेष आणि फोन पे, गुगल पे, पेटीएम, या सर्व अँप ला लिंक करून व्यवहार केल्या जाऊ शकतो विशेष म्हणजे पोस्ट खाते हे केंद्र शासनाच्या निगराणी अंतर्गत येत असल्यामुळे या ठिकाणी गुंतवणूक केल्यास फसगतीची व पैसे डुबण्याचे प्रमाण नगण्यच असते काही त्रुटी असू शकतात पोस्ट कार्यालयाशी संपर्क करून सविस्तर माहिती घ्यावी तसे बघता खाजगी वित्तीय ठिकाणा नी सध्या जिकडे तिकडे धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे गुंतवणूक केल्यास अवाच्या सव्वा व्याजदर देण्याचे आमिषे दाखवून तशा प्रकारचे दर पत्रक अनेक ठिकाणी फिरताना बघायला मिळत असून त्यांचे कमिशन रूपातील “वळू” सगळीकडे सुसाट सुटले असून त्यांना दर्जेदार कमिशन आहे व कमिशन द्वारे त्यांनी आपल्या तुंबड्या सुद्धा भरल्या पण त्यांना ग्राहकांचे काही घेणे देणे नसते गुंतवणूक ज्या ठिकाणी केली त्यांनी पोबारा केल्यास त्या कमिशनखोरांचे काय जाणार बुडतो आणि फसतो तो सर्वसामान्य ग्राहकच खाजगी वित्तीय ठिकाण कधी पोबारा करतील व कधी चड्डीत चिरकतील काही सांगता येत नाही तेव्हा खाजगी वित्तीय ठिकाणी गुंतवणूक करायची असल्यास जरा सावध राहूनच करावी कधी पोबारा होईल काही सांगता येत नाही व गुंतवणूक करा म्हणणाऱ्या समाज सेवकापासून दूर राहूनच गुंतवणूक करायला हवी

    

Leave a Reply