

सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात येवुन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग मालक, व्यापाऱ्यांवर कारवाई करावी या महत्वाच्या मागणीसह विविध न्याय मागण्यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सेकडो मनसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन करत यात सहभाग नोंदवला.मनसे जिल्हा उपाध्यक्ष शँकर वरघट यांच्या नेतृत्वात तहसीलदार राळेगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या सह खालील मागण्या करण्यात आल्या यात नुकसान होवुन सुद्धा शेतकऱ्यांना पिक विमा न देणाऱ्या विमा कंपनी वर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
शेतकऱ्याच्या कृषि पंपाला१२ तास मोफत विज पुरवठा करण्यात यावा
अवकाळी पावसाने शेतातील पिकांची झालेल्या नुकसानीची तत्काळ मदत द्यावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या
यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणुन प्रसिद्ध असुन यामध्ये राळेगाव तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात कापुस/तुर लागवड केली जाते याच कापसाच्या/तुरीच्या उत्पन्नाच्या भरवशावर शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा वेचनिसाठी कापुस आला असतानाच तसेच ऐन बहार/फुलांवर तुरी असतांना अवकाळी पावसाने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे त्यामुळे लागवड खर्चा पेक्षा उत्पन्न कमी झाल्याने जगायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला असुन शेतकऱ्यांच्या याच अडचणीचा फायदा घेत तालुक्यातील काही कापुस जिनींग मालक, व्यापारी कमी भावाने कापुस खरेदी करून शेतकऱ्यांना लुटत आहेत त्याच तालुक्यात कापुस खेडा खरेदी सुरू असून यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांना लुटून खाण्याचा धंदा जोमात सुरू आहे त्यामुळे आपण याकडे लक्ष घालुन शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२हजार रुपये भाव, तुरीची झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, तसेच कमी दराने कापुस खरेदी करणाऱ्या जीनिंग मालक, व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, खेडा खरेदी तत्काळ बंद करून असे व्यवहार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.
यंदाच्या खरीप हंगामात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने शेतातील पिकांसह जमिनी खरडून गेल्या होत्या याचा कोणताच मोबदला मिळाला नाही परंतु पिक विमा तरी मिळेल ही भाबडी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली असतांनाच पिक विमा कंपनीच्या मनमानी कारभाराचा मोठा फटका बसला विमा कंपनीने शेतकऱ्यांना ,१,२,२०अशा रक्कमा देवुन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या विमा कंपनी प्रशासनावर तत्काळ फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येवुन शेतकऱ्यांना तत्काळ झालेल्या नुकसानीची विमा रक्कम देण्यात यावी दिवाळी नंतरच्या अवकाळी पावसाने शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची तत्काळ मदत द्यावी
तसेच महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी मुळे शेतकऱ्यांना शेतीला सिंचन करणे अवघड होवुन बसले आहे .विद्युत पुरवठा नसतांना ही वीज बिल मात्र सक्तीने केल्या जात आहे.त्यामुळे ही सुलतानी वसुली थांबवुन शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी याकरिता दिवसा १२ तास मोफत व सुरळीत विद्युत पुरवठा करण्यात यावा ही विनंती.
या अगोदर सुद्धा अनेक वेळा निवेदने देवुन सुद्धा कोणतीही दखल घेतल्या गेली नसल्याने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तसेच शेतकऱ्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहाचाव्यात याकरिता सदर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.परंतु येणाऱ्या काळात आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मनसेच्या वतिने यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल याचा
असा इशारा देण्यात आला आहे
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, सुरज लेणगुरे, संदिप कुटे, आरीफ शेख, जिवा बुरडकर, रोशन गुरूनुले, नरेंद्र खापणे, गजु बुटे, गणेश भोयर, संदीप गुरुनुले, राहुल भोयर, गोपाल मांदाडे ,अविनाश सिरासम, वामन लेणगुरे, नरेश मादाडे, आकाश पाटील, विलास मांदाडे, अखील शेख, युवराज चटकी, रामाजी डाहुले, उमेश पेंन्दोर, ओम मडावी, प्रवीण ओंकार, ऋषिकेश मिर्झापूरे, स्वप्नील भेदूरकर, सचिन आत्राम, रतन चव्हाण, सूरज खैरी, अमोल गेडाम, मनसे पदाधीकारी, आणी महाराष्ट्र सैनिक, तथा शेतकरी उपस्थित होते.
