
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
:–
सावित्री पिपरी येथील विकास गेडाम वय २१ या तरुण युवकाने दिं १५ ऑक्टोबर २०२२ रोज शनिवारला सायंकाळी साडेसहा वाजताचे दरम्यान आपले वडील विजय निळकंठ गेडाम वय ५० वर्ष यांची दगडाने ठेचुन हत्या केल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की विजय गेडाम हे आपल्या घरी होते तेव्हा त्याचाच मुलगा विकास गेडाम हा बाहेरून घरी आला असता विकासाने वडिलांच्या डोक्यावर दगडाने ठेचून ठार केल्याची घटना घडली असून या घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनचे ठानेदार विनायक जाधव यांना मिळताच तातडीने ठानेदार विनायक जाधव घटनास्थळी जाऊन बिट जमादार अरुन भोयर यांना घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सांगुन आरोपीचा शोध घेणे सुरु केले असता आरोपी खैरी येथे असल्याचे माहीती मिळताच तातडीने ठानेदार विनायक जाधव व सहकार्याना घेऊन खैरी येथे जाऊन आरोपीला अवघ्या काही मिनटात अटक केली . व मयत विजय निळकंठ गेडाम यांना शवविच्छेदना करीता राळेगाव ग्रामिण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले . पुढील तपास पोलिस करीत आहे .
