
सहसंपादक-रामभाऊ भोयर
राळेगाव वरून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वाऱ्हा येथील सुनील कुंदन येडमे वय ४३ वर्ष हा दोन-तीन दिवसांपूर्वी घरून निघून गेला होता. आज दिं ७ एप्रिल २०२३ रोजी वर्धा नदी पात्रात वाऱ्हा गावालगत आढळून आला आहे.
सविस्तर वृत्त असे की सुनील येडमे हा रोजमजुरीचे काम करीत असे. तो दोन तीन दिवसांपासून घरच्याला कुणालाही न सांगता तो घरून निघून गेला होता. त्याचा घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतु तो कुठेही आढळून आला नाही. आज शरद वाळवे गुराखी गुरे चारत असतांना त्यांना सुनील येडमे यांचा मृतदेह आढळून आला.त्यांनी लगेच येथील सरपंच गजानन घोटेकर यांना फोन करून सांगितले की नदीपात्रात मृतदेह आढळून आला आहे. ही माहीती सरपंच यांनी घरच्याना सांगितली. या बाबतची माहिती पोलीस स्टेशनला दिली असता पोलिसांनी सुनीलचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदना करिता राळेगाव येथे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार संजय चौबे यांच्या मार्गदर्शनात गोपाल वास्टर करत आहे.
