
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका स्तरावर होऊ घातलेल्या क्रिडा स्पर्धेत दिंनाक 23/11/2022 रोजी मार्कंडेय इंग्लिश स्कूल बरडगाव येथे सतरा वयोगटातील मुंलीचा कब्बडी खेळ संपन्न झाला.त्यामध्ये अंतिम सामन्यात वसंत माध्यमिक विद्यालय पिंपळखुटी यांचा लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव यांनी धक्कादायक पराभव करून जिल्ह्यासाठी आपला प्रवेश निश्चित केला.या संघासाठी कोच म्हणून श्रावनसिंग वडते सर,क्रिडा शिक्षक मोहन बोरकर सर,सौ.वंदना वाढोणकर मॅडम, शुभम मेश्राम सर यांचे विजयी संघाला मार्गदर्शन लाभले.हा खेळ यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे दिगांबर बातुलवार सर, रंजय चौधरी सर,राजेश भोयर सर,वाल्मिक कोल्हे बाबू,मोहन आत्राम सर, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा खेळ पार पाडण्यासाठी क्रिडा कार्यालयाकडून प्रफुल्ल खडसे सर, अतुल मेश्राम, किशोर ऊईके सर, विशाल हजारे,सागर जुमनाके तथा क्रिडा अधिकारी मिलमिले सरांनी अथक परिश्रम घेतले.हे सर्व खेळ मार्कंडेय इंग्लिश स्कूल बरडगाव येथे संपन्न झाले . मुलीच्या खेळाचे प्रदर्शन पाहून उपस्थित शिक्षक,प्रशिक्षक, व्यवस्थापकांनी मुंलीची स्तुती केली.असून विजयी संघाचे विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर यांनी अभिनंदन केले असून जिल्ह्यासाठी शुभेच्छा दिल्या.त्यावेळी रमेश टेंभेकर सर,विशाल मस्के सर,सौ.कुंदा काळे मॅडम,सौ.स्वाती नैताम मॅडम, वैशाली सातारकर मॅडम,पवन गिरी बाबू, अश्विनी तिजारे मॅडम,सौ.दिपाली कोल्हे मॅडम,रोहणकर मॅडम, बाबूलाल येसंबरे, विनोद शेलवटे उपस्थित होते त्यांनी सुध्दा विजयी संघाचे अभिनंदन केले.
