
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
ढाणकी शहरामध्ये दिनांक २० रोजी पावसामूळे सगळे गाढ झोपेत होते ढाणकी शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये राहणारी कविता शिवाजी नारमवाड वय २७ वर्ष हिचा तिच्या पतीने मध्यरात्री सुरा मारून खून केला
सविस्तर असे ढाणकी येथील कविता हिचा चिंचाळा तालुका भोकर येथील शिवाजी नारमवाड सोबत सण २०१२ मध्ये विवाह झाला लग्नाचे दोन वर्ष आनंदाने सुख समाधानात गेले कविताला संसार वेलीवर २०१३ मध्ये पुत्र झाला कविता च्या संसारात अधिकच आनंद द्विगुणित झाला काही दिवस सुखाने गेले कवितांच्या संसाराला नजर लागली कविताच पती शिवाजी कविता वर संशय घेऊन मारझोड करत असे पतीच्या संशयावरून होणाऱ्या मानसिक शारिरीक त्रासाला कंटाळून कविता आपल्या माहेरी ढाणकी येथे मुलासह राहायला आली माहेरी आल्यावर आपल्या झोपडी वजा घरात आई सोबत लोकांचे धुणे भांडे करून उदरनिर्वाह करू लागली माहेरी आलेल्या कविताला शिवाजी च्या त्रासा पासून सुटका मिळाली नाही शिवाजी अधून मधून मनाला वाटेल तेव्हा कविताला भेटण्यास येत असे आल्यावरही कविताला त्रास देत होता
आपल्या मुलीचे काय होणार याच विवनचनेत भागीरथा बाई लोकांचे कामे करून मुलीच्या संसाराला हातभार लावत होती भाग्यरथा बाई कामाच्या शोधात दोन दिवसा पूर्वी आदिलाबाद येथे कामाला गेली होती दिनांक २० जुलै रोजी नेहमी प्रमाणे कवितांचा पती शिवाजी रात्री ८ वाजून ३० मिनिटाने ढाणकी येथे आपल्या पत्नीला भेटण्यास आला रात्री जेवण करून झाल्या नंतर शिवाजी नेहमी प्रमाणे संशय घेऊन वाद घालत होता झोपडी वजा घरात सासू नसल्याची संधी साधून शिवाजी याने मध्यरात्री ३ वाजे दरम्यान आपल्या पत्नी कविताच्या माने वर सुरा मारून जखमी केले आईच्या ओरडण्याने मुलगा नरेंद्र उठला वडिलांचे कृत्य पाहून घाबरून जात रडून घरा बाहेर जात आपल्या नातेवाईक यांना उठविले कविता वर सुरीने वार केल्याने घटनास्थळा वरून पळ काढला मानेत झालेला घाव घेऊन कविता घराबाहेर आली आसता शेजारील नातेवाईकांनी कविताला त्वरित डॉक्टर रावते यांच्या दवाखान्यात नेण्यात आले डॉक्टरांनी कविताला सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले सरकारी दवाखान्यात आणल्या नंतर डॉक्टर यांनी कविताला मृत घोषित केले
कविताचा खून झाल्याची वार्ता शहरात पसरताच नागरिकांनी कविताला पाहण्यास सरकारी दवाखान्यात बघ्यानी मोठी गर्दी केली होती.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून कविताला मारलेला सुरा मोबाईल जप्त केला मृतदेह चे शवविच्छेदन डॉक्टर ज्योती अंगकाढे यांनी केले
मृतकाची बहीण वनिता गजानन दुपलवाड हिच्या तक्रारी कवितांच्या मारेकऱ्यावर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा तपास ठाणेदार सुजाता बनसोड करत आहेत.
कविताच्या फरार झालेल्या मारेकऱ्याला शोधण्याचे पोलिसा समोर आव्हान उभे टाकले आहे कवितांचा खून करणारा मारेकरी पोलीसांना मिळणार का अशी चर्चा नागरिक करत आहे
कविताचा खून नवऱ्याने केला आणी तो फरार झाला कविताच चिमुकला नरेंद्र ढाणकी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ४ थ्या वर्गात शिकत आहे आईच्या खुनाने नरेंद्र मात्र आई वडिलाला पोरका झाला
