कांग्रेस पक्षाच्या ओबीसी विभाग यवतमाळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्रावनसिंग वडते सर



सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथील कांग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते तथा खरेदी विक्री संघाचे संचालक अनेक वर्षापासून बंजारा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष असलेले श्रावनसिंग वडते सर यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग यवतमाळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांना कांग्रेस ओबीसी सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भानुदास माळी यांच्या हस्ते तेलंगणाचे कांग्रेस पक्षाचे आमदार डॉ राजेश रेड्डी, दुसरे आमदार बहादूर साहेब यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. श्रावनसिंग वडते सर हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राळेगाव तालुका प्रसिद्धी प्रमुखांची जबाबदारी नुकताच पक्षाने त्यांना दिली आहे. याही अगोदर त्यांनी अनेक अशासकीय समितीचे तालुका सदस्य म्हणून काम केले असून त्यांच्या कार्याची दखल घेत दिनांक 8/ 10 /2024 रोजी आयोजित केलेल्या ओबीसी विभागाच्या जिल्हा मेळाव्यात त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.ते त्यांच्या निवडीचे श्रेय महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके सर, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रफुल्लभाऊ मानकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर अरविंद वाढोणकर कांग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे यांना देत असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.