
बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी//शेख रमजान
बंद घराच्या दरवाजाची कडी उघडून घरामधे प्रवेश करून १) एक पांढऱ्या रंगाची टिंव्ही एस ज्युपीटर ए एच २९ बी के ३११९ किमत २०,०००/रू २) चांदीचे वस्तु अंदाजे २० तोळे किंमत १२०००रू ३) नगदी रूपये २२००/रू असे एकुण ३४२००/रू चा मुददेमाल चोरीस नेल्याची घटना उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे दि. ०६/०७/२४ रोजी चे रात्री १ते २व दरम्यान घडली. फिर्यादी अविनाश दिगांबर पवार वय ४२ वर्षे व्यवसाय मेडीकल चालक, रा. साईश्रध्दा नगर ढाणकी, ता. उमरखेड जि. यवतमाळ यांचे बिटरगांव ( बु ) पोलीस ठाण्यात जबानी रिपोर्ट दिला असून त्यात म्हटले की, नेहमी प्रमाणे माझे कुटुंबास भेटण्याकरिता नांदेड येथे गेलो असता दि.०७/०७/२४ रोजी सकाळी ०५/३० वा सुमारास माझे घरी वरच्या माळयावर राहणारे भाडेकरू विजय पाटील येमगर यानी मला फोन करून सांगितले की, “रात्री दरम्यान आमचे घराचे मेन दरवाज्याचे बाहेरून कडीकोंडा लावुन दरवाज बंद केला आहे, तेव्हा मी विकास रामराव निकम याना फोन लावुन आमचे घराचे कोणीतरी कडीकोंडा लावला आहे, तरी माझे घराकडे या असे सांगितले वरून त्यानी माझे घराचा बाहेरून लावलेला कडीकोंडा उघडला तसेच माझे शेजारी राहणारे भाडेकरू यांचा देखील कडीकोंडा काढला, वरच्या माळयावरून खाली येवुन पाहिले असता तुमच्या घराचा मेन दरवाजा उघडा दिसला व दवाज्याची कड़ी तुटलेली दिसली व दरवाज्याचे कुलुप खाली पडलेले दिसले तसेच तुमची स्कुटी देखील दिसत नाही” असे सांगितले. मला अशी माहिती मिळाल्याने मी लगेच नांदेड येथुन सकाळी ०६/०० वा निघुन ढाणकी येथे आलो व घराची पाहणी केली असता माझे घरा समोर लावुन असलेली माझी पांढऱ्या रंगाची टिव्ही एस ज्युपीटर एम.एच २९ बी.के ३११९ चेसीस न. MD626EG46J1H55397 इंजिन न.EG4HJ18C3020 असलेली मला दिसुन आली नाही. तसेच मी घरातील बेडरूम मध्ये जावुन पाहीले असता बेडरूम मधीन दोन्ही कपाट उघडे दिसले व त्यातील काही सामान बाहेर काढुन अस्ताव्यस्त फेकलेले, पडलेले दिसले. पहिल्या कपाटात ठेवलेले नगदी २२००रू व दुसऱ्या कपाटात ठेवुन असलेले चांदीचे चैन १, बाजुबंद १ जोड, जोडव एक जोड, बिचवे, पंचपाळ १, ताट १, निरंजन २ असे चांदीचे वस्तु अंदाजे २० तोळे किंमत १२०००रू चे कपाटत दिसुन आले नाही. या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता अन्वये अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करून तपासात घेतला असुन पुढील तपास ठाणेदार प्रेम कुमार केदार यांच्या मार्गदशनात पोउननि शिवाजी टिपुर्णे पो. स्टे. बिटरगाव हे करीत आहे.
